Headlines

S Janaki : सुप्रसिद्ध गायिका एस. जानकी यांचं निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप


S Janaki Passes Away : सुप्रसिद्ध गायिका एस. जानकी यांचं वयाच्या ८८व्या वर्षी निधन झालं आहे.

S Janaki Passes Away
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका एस. जानकी यांचं म्हैसूर येथे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं आहे. चाहत्यांमध्ये आणि संगीत विश्वात त्या ‘जानकी अम्मा’ या नावानं ओळखल्या जायच्या. जानकी अम्मा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट गाणी सादर केली. त्यांच्या अतुलनीय अभिनयामुळे त्यांना चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. संगीतातील योगदानाबद्दल त्यांना ३३ राज्य चित्रपट पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं.

जानकी अम्मा यांनी आपल्या कलेशी किंवा सन्मानाशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच, २०१३ मध्ये जेव्हा केंद्र सरकारनं देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली, तेव्हा त्यांनी तो पुरस्कार स्पष्टपणे नाकारला. त्यावेळी जानकी अम्मा यांचं म्हणणं होतं की, भारतीय संगीतातील त्यांच्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता. जानकी अम्मा यांच्या निधनानं संगीत विश्वात एक अशी पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

४८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली

प्रसिद्ध गायिका एस. जानकी यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत चित्रपट, अल्बम आणि रेडिओसाठी ४८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्या भारतातील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक होत्या. त्यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदीसह २० भारतीय भाषांमध्ये, तसेच अनेक परदेशी भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली.
Maharashtra TimesMandira Bedi : पतीचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन, मानसिकरित्या खचलेली अभिनेत्री, घ्यावी लागलेली थेरेपी
एस. जानकी यांचा जन्म २३ एप्रिल १९३८ रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी पहिलं तमिळ गाणं रेकॉर्ड केलं. संगीत उद्योगाला ६० वर्षे समर्पित केल्यानंतर, त्या २०१६ मध्ये निवृत्त झाल्या. पण, त्यांनी २०१८ मध्ये एका तमिळ चित्रपटातून पुन्हा पदार्पण केलं. एस. जानकी तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषा अस्खलितपणे बोलायच्या. त्यांनी १९५९ मध्ये व्ही. रामप्रसाद यांच्याशी लग्न केलं. त्यांनी एस. जानकी यांची कारकीर्द घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये त्यांना साथ दिली. एस. जानकी यांनी आपली बहुतेक गाणी कन्नड आणि मल्याळम भाषेत गायली. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी, एक बालकलाकार म्हणून पहिल्यांदा रंगमंचावर सादरीकरण केलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा