Headlines

Spruha Joshi : 10 वर्षांपूर्वी कपड्यांवरून ट्रोल, स्पृहा जोशीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘त्या व्यक्तीला मी ब्लॉक करते’


Spruha Joshi : स्पृहा जोशीला १० वर्षांपूर्वी तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलेलं. त्याबद्दल अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलंय.

Spruha Joshi On Trolling
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे ट्रोलिंगचं प्रमाण अधिकच वाढलं आहे. अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कपड्यांवरून, खाण्यावरून, दिसण्यावरून कलाकारांना ट्रोल केलं जातं. अभिनेत्री स्पृहा जोशीच्या बाबतीतही काही वर्षांपूर्वी असंच काहीसं घडलं होतं. याबद्दल अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

स्पृहा जोशीनं केला ट्रोलिंगचा सामना

स्पृहा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. दैनंदिन जीवनातील घडामोडी, त्याचबरोबर कामासंदर्भात अपडेट्स ती सोशल मीडियामार्फत चाहत्यांना देते. मात्र, काही वर्षांपूर्वी स्पृहाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलेलं. याबद्दल बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की, ‘मी १० वर्षांपूर्वी हॉल्टर नेक ब्लाउज परिधान केलेला फोटो पोस्ट केलेला. तो फोटो बघून लोकांनी मला ट्रोल केलं. इतकं की, त्याची वर्तमानपत्रात बातमी छापून आली आणि त्या फोटोमध्ये काहीच नव्हतं. गंमत अशी की, काही असतं आणि ट्रोलिंग झालं असतं तर मी समजू शकले असते. पण, काहीच नव्हतं त्यात. त्यावरून ट्रोल झाले.’

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

आणखी एक ट्रोलिंगचा अनुभव सांगताना स्पृहा म्हणाली की, ‘एक मासा खाताना आणि खेकडा खातानाचा फोटो टाकला, त्यावरून ट्रोल झाले. मी एकाही निगेटिव्ह कमेंटला उत्तर देत नाही. कारण, मला असं वाटतं की, मी माझी शक्ती किती खर्च करू? ट्रोलिंगचं प्रमाण इतकं वाढलंय की, ट्रोल करणाऱ्याची कमेंट मी हाईड करते किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करते. माझे फॉलोअर्स किती आहेत, याने मला फरक नाही पडत. छान बोलायचं असेल तर वेलकम. घाणेरडं बोलायचं असेल तर नका येऊ.’ असं स्पृहानं सांगितलं.
Maharashtra TimesMandira Bedi : पतीचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन, मानसिकरित्या खचलेली अभिनेत्री, घ्यावी लागलेली थेरेपी
‘अनोळखी लोकांनी मला मी काय खायचं, काय कपडे घालायचे हे सांगितलेलं आवडत नाही. कपड्यांवरुन लोकांना बोलणं, हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे काय तुम्ही घातलंय हे बोलणं मला आवडत नाही. हा अधिकार मी फक्त माझ्या घरच्यांना दिलेला आहे. हे मला अजिबात अवडत नाही.’ असंही स्पृहानं मुलाखतीदरम्यान सांगितलं. ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पृहा जोशी बोलत होती.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा