Headlines

Parbhani Manavat Yashwadi Five People Died after Stone Pillar Collapsed at Trimurti Hanuman Temple; हजारो भाविक महाप्रसादासाठी आलेले, त्याचवेळी आक्रित घडलं, दगडी खांब कोसळून 5 भाविकांचा करुण अंत, महाराष्ट्र हळहळला; Video


Parbhani Yashwadi Temple Incident : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. छताचे दगडी खांब कोसळून पाच भाविकांचा जागीच मृत्यी झाला आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Parbhani Yashwadi Temple Incident
यशवाडी त्रिमूर्ति हनुमान मंदिर पाच जणांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिरात सभामंडपाचे बांधकाम सुरू असून, शनिवारी छताचे दगडी खांब अचानक कोसळले. या दुर्घटनेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे; तर १६ गंभीर जखमी भाविकांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आर्थिक मदत

मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा शिवारात हे मंदिर असून, दर शनिवारी हजारो भाविक येथे दर्शन आणि महाप्रसादासाठी येतात. सध्या मंदिर परिसरात गाभारा व सभामंडपाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. या बांधकामात मोठ्या प्रमाणावर दगडांचा वापर करण्यात येत असून, छताला आधार देण्यासाठी लाकडी फळ्या व खांब टेकविले आहेत. दुपारी तीनच्या सुमारास दोन रांगा लावून भाविक दर्शन घेत असताना अचानक छताचा संपूर्ण भाग लाकडी खांबांसह अचानक भाविकांच्या अंगावर कोसळला.

Maharashtra TimesPune News: पुणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, रेल्वेखाली भुयारी मार्ग आणि वर उड्डाणपूल बांधणार; शहराला मोठा फायदा

विशेषतः दगडी बांधकामाचा भाग भाविकांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली १५ ते २० भाविक दबून गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात; तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले.
Maharashtra TimesJEE Student Ends Life: ‘आई सॉरी…’ चिठ्ठी लिहून JEEच्या विद्यार्थिनीची एक्झिट; अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं टोकाचा निर्णय

मृतांची नावं समोर

दरम्यान, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे. ढिगारा उपसण्यासाठी पाच जेसीबी मशिन आणि ५० हून अधिक रुग्णवाहिकांद्वारे जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. संतोष गडदे (रा. पांगरा, ता. मंठा), आकाश सुरदोसे (गंगाखेड रोड, परभणी), नुमेश अग्रवाल (जिंतूर), सूरज कोपरटकर (इटाळी), श्रीकृष्ण बलभीम गवारे (रा. चिंचवडगाव, ता. वडवणी) अशी मृतांची नावे आहेत. अनिकेत संतोष गडदे (पांगरा, ता. मंठा), हनुमंत लिपने (बोरगाव), प्रवीण प्रकाश राजबिडे, नारायण दौलत खरात (जवळा), दादाराव नागोजी भांगे (जवळा), रामकृष्ण बदाडे (माजलगाव), परमेश्वर कुंडलिक राऊत (लोणी), केशव गिरी (देऊळगाव अवचार), नागेश विठ्ठल इक्कर (कुंभारी), प्रवीण रघुनाथ हलगे (सेलू), ओंकार मारोती कोपर्तेकर (निटाळी), सौरभ गजानन कोथळकर, हृषीकेश कोपर्तेकर, रामा घुगे, रामेश्वर बोंडे आणि धनंजय बोचरे (कुंभारी बाजार) अशी जखमींची नावे आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा