Parbhani Car Accident while Distributing Wedding Invitations Daughter Marriage Father Death; लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप, मध्यरात्री काळाची झडप; मुलीला सासरी पाठवण्याआधी बापाचा करुण अंत
Parbhani Car Accident while Distributing Wedding Invitations Daughter Marriage Father Death; लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप, मध्यरात्री काळाची झडप; मुलीला सासरी पाठवण्याआधी बापाचा करुण अंत
Parbhani Accident : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येताना दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात होणाऱ्या वधुच्या वडिलांचा आणि ज्येष्ठ पत्रकाराचा, असा दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी : मुलीचं लग्न जमलं आणि तिच्या लग्नाच्या पत्रिका आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना देण्यासाठी परभणीच्या उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक असलेले संजय अब्दागिरी आपल्या अन्य तीन मित्रांसह छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे गेले होते. रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरहून परभणीकडे येत असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास परभणीच्या चारठाणा परिसरात जालना जिंतूर महामार्गावर दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला आणि या अपघातात सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरी यांच्यासह परभणीचे ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. दोघांच्या मृत्यूची वार्ता जिल्हाभरात पसरल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
लग्नाच्या पत्रिका वाटप करताना अनर्थ
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या उपनिबंधक कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक संजय अबदागिरी यांच्या मुलीचं 7 फेब्रुवारी रोजी लग्न होणार आहे. आपल्या मुलीचं लग्न असल्यामुळे आनंदात वडील संजय अब्दागिरी हे स्वतः आप्तेष्टांना भेटून लग्नपत्रिका वाटत होते. काल देखील ते आपल्या अन्य तीन मित्रांसोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी गेले होते. काल रात्री उशीरापर्यंत लग्नाच्या पत्रिका वाटप केल्यानंतर पुन्हा ते परभणीकडे रवाना झाले. Ajit Pawar : अजितदादांची आठवण उडत-उडत पायाजवळ आली… ‘तो’ कागद दाखवणारा बारामतीतला व्हिडिओ, विमान अपघातानंतर…
ज्येष्ठ पत्रकाराचाही मृत्यू
परभणीकडे येत असताना रात्री एकच्या सुमारास जालना जिंतूर महामार्गावर जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरात त्यांच्या कारला क्रमांक MH 22 AW 5115 जिंतूरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारने क्रमांक MH 14 FS 0897 जोरदार धडक दिली. जिंतूरच्या चारठाणा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपूर गावाजवळ ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. दरम्यान, या भीषण अपघातात ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरी यांच्यासह अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी यांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयामध्ये ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना मृत घोषित करण्यात आले तर अन्य तिघांवर उपचार सुरू करण्यात आले. आज सकाळी उपचारादरम्यान सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरी यांचा मृत्यू झाला. Mumbai Weather: मुंबईत तापमानाचा पारा चढला, उद्या 2026 मधील सर्वाधिक उष्ण दिवस; ‘या’ भागांत 34°C वर तापमान
दरम्यान, त्याचबरोबर जखमी असलेले मनोज कन्हैयालाल तोष्णीवाल आणि विजय ताडकळसकर दोघेही (रा. परभणी) यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रशासनातील एक ज्येष्ठ अधिकारी आणि एका ज्येष्ठ पत्रकाराचा मृत्यू झाल्याने परभणी जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा