Headlines

Pankaj Vishnu : ‘खूप मेहनती, काहीतरी नवीन करण्याची धडपड, आउटसाईडर असून यश मिळवलं’, सुशांत सिंह राजपूतबद्दल भरभरून बोलला मराठी अभिनेता


Pankaj Vishnu On Sushant Singh Rajput : मराठी अभिनेते पंकज विष्णू यांनी सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलेलं.आता नुकत्याच एका मुलाखतीत पंकज यांनी सुशांतच्या आठवणी सांगितल्या आहेत.

Pankaj Vishnu On Sushant Singh Rajput
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सहा वर्षांपूर्वी १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या मृत्यूनं संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसलेला. अभिनेता मुंबईतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळलेला. सुशांतनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, अभिनेत्याला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनं ओळख मिळाली आणि तो घराघरात प्रसिद्ध झाला. आजही चाहते आणि कलाकार सुशांतची आठवण काढतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत काम करणारे मराठी अभिनेते पंकज विष्णू यांनी सुशांतची आठवण शेअर केली आहे.

सुशांतबद्दल काय म्हणाले पंकज विष्णू?

मुलाखतीदरम्यान पंकज विष्णू म्हणाले की, ‘सुशांत अतिशय मेहनती आणि हुशार मुलगा होता. मीसुद्धा इंजिनिअर असल्यामुळे आमची चांगली मैत्री झालेली. आम्ही जवळपास दोन वर्ष एकत्र काम केलं. तो सरळमार्गी मुलगा होता, त्याच्यात आत्मविश्वासही खूप होता. सुशांत ‘पवित्र रिश्ता’चं शुटिंग करत होता, तेव्हा तो डान्स शो शोसुद्धा करायचा. सकाळी जुहू बीचला अॅक्शन सीन्स शिकायला जायचा, त्यानंतर डान्स शोच्या शुटिंगला जायचा, तिथून ‘पवित्र रिश्ता’च्या शुटिंगला यायचा.’

Maharashtra TimesAjit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
‘सतत स्वतःमध्ये बदल करायचा. काहीतरी नवीन करण्याची त्याची धडपड असायची. तो आउटसाईडर असून त्यानं एवढं यश मिळवलं, याबद्दल त्याचं खूप कौतुक आहे. त्याच्यासोबत असं व्हायला नको होतं. मालिकेनंतर त्याने ब्रेक घेतलेला आणि ‘काय पोछे’ सिनेमातून त्यानं पुन्हा बाजी मारली. त्यानंतर सुशांतला अनेक सिनेमे मिळत गेले. मिळत गेलेल्या संधीचं त्यानं सोनं केलं. लोकांना तो आपल्यातलाच एक वाटायचा. सुशांत आज असता तर अनेक छान कलाकृतीतून तो आपल्या भेटीला आला असता.’ असं पंकज यांनी शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकज विष्णू बोलत होते.

Maharashtra TimesLucky Ali : ‘जिथे माझा जीव जाईल तिथेच मला दफन करा, मी माझी शवपेटी घेऊन फिरतो’, सुप्रसिद्ध गायकाचं डोळे पाणावणारं वक्तव्य

सुशांत सिंह राजपूतबद्दल

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. चाहत्यांमध्ये ‘एसएसआर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशांत सिंगनं आपले प्राथमिक शिक्षण पाटणा येथील सेंट कॅरेन हायस्कूलमधून घेतलं. पुढे अभिनेत्यानं इंटरमीडिएट शिक्षण कुलाची हंसराज मॉडेल स्कूलमधून पूर्ण केलं. सुशांतनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी दिल्ली स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आणि भौतिकशास्त्रातील राष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकले. शिक्षण अर्धवट सोडून अभिनयात करिअर करण्यासाठी सुशांत मुंबईला आला.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

सुशांतनं २००८ मध्ये ‘किस देश में है मेरा दिल’ या शोमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. २०१० मध्ये, त्यानं ‘जर नचके दिखा’ आणि ‘झलक दिखला जा’ या दोन डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला.

Maharashtra TimesDharmendra :विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, दोन लग्न होऊनही लोकप्रिय अभिनेत्रीसोबत अफेअर; धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य होतं चर्चेत
सुशांतनं २०१३ मध्ये ‘काय पो छे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ (२०१३), ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ (२०१५), ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ (२०१६), ‘राबता’ (२०१७), ‘केदारनाथ’ (२०१८), ‘ड्राइव्ह’ (२०१९) आणि ‘छिछोरे’ (२०१९) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानं राजकुमार हिरानीच्या ‘पीके’ आणि अभिषेक चौबेच्या ‘सोनचिरीया’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. सुशांतच्या मृत्यूनंतर २४ जुलै २०२० रोजी त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा