Headlines

Palghar Ashram School: मासवण आश्रमशाळेत एकाचा करुण अंत; 19 विद्यार्थी तापाने फणफणले, साथीच्या आजाराची भीती – palghar maswan ashram school 7yrs old boy died 19 students high fever fear of an epidemic


म. टा. वृत्तसेवा, पालघर : नंदुरबार आणि गडचिरोली येथील आश्रमशाळांमधील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पालघर तालुक्यातील मासवण येथील आश्रमशाळेत सात वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच आश्रमशाळेतील १९ विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे आढळल्याने त्यांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे साथीच्या आजाराची भीती व्यक्त केली जात आहे.

श्रेयस शैलेश आंबात असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रविवारी सकाळी त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रेयस शनिवारीपर्यंत सुस्थितीत होता, असे आश्रमशाळेतील शिक्षकांनी सांगितले. मात्र रविवारी सकाळी अचानक त्याला धाप लागण्यास सुरुवात झाली. तातडीने मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनच्या साह्याने १०२ रुग्णवाहिकेतून त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesNarali Purnima : नारळी पौर्णिमेपासून समुद्रात गजर; सात बोटी सज्ज, 30 हजार परप्रांतीय कामगारांवर मासेमारी हंगामाची भिस्त‘मासवण परिसरात एका बालकाचा प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तापाची लक्षणे असलेल्या सर्व १९ विद्यार्थ्यांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर परिस्थितीचे नेमके चित्र स्पष्ट होईल’, अशी माहिती पालघर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश डुंपलवार यांनी दिली. संभाव्य साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्यात आले. डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांच्या तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते; मात्र त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट आजाराचे निदान झाले नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, आश्रमशाळेतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी डहाणूचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती डॉ. डुंपलवार यांनी पत्रकारांना दिली.

Maharashtra TimesPalghar News: शिक्षणासाठी जंगलातून रोज जीवघेणा प्रवास; जव्हारमधील 12 आदिवासी विद्यार्थिनींची व्यथा‘मृत्यूचे कारण तातडीने शोधावे’

एका बालकाचा १५ दिवसांपूर्वी अचानक मृत्यू, त्यानंतर आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थ्याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू आणि आता १९ विद्यार्थ्यांना तापाची लागण या सलग घटनांमुळे मासवण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत कोणत्याही विशिष्ट आजाराचे निदान झाले नसले तरी या घटनांमागील नेमके कारण तातडीने शोधावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी मृत्यू होतायेत. काय उपाययोजना करणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत