No No-Ball Records : भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताचा तिसरा दिवस असून भारत गोलंदाजी करत आहे. या सामन्यात पदार्पणवीर सारांश जैन याने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. पण असे खेळाडू ज्यांनी करियकमध्ये एकही नो बॉल टाकलेला नाही.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५०३-९ धावा केल्या असून श्रीलंकेला सुरूवातील भारताने दोन विकेट घेत झटके दिले आहेत. या सामन्याचा आज तिसरा दिवस सुरू झाला असून सारांश जैन हा वयाच्या ३३ व्या वर्षी भारताकडून पदार्पण करतोय. आज कॅप्टन शुभमन गिल याने सारांश जैनकडे चेंडू सोपवल्यावर आपला पहिलाच बॉल त्याने नो-बॉल फेकला. पण तुम्हाला माहिती काही असे खेळाडू ज्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये कधी वाईड किंवा नो बॉल फेकला नाही. यामध्ये भारताच्या माजी कर्णधाराचा समावेश असून ते एकमेव भारतीय ऑल राऊंडर खेळाडू आहेत. नेमक कोण आहेत? त्यासोबतच जगातील इतर खेळडू ज्यांनी कधी नो-बॉल टाकलेला नाही. जाणून घ्या.
भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर हा विक्रम आहे. कपिल देव यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. ही वर्ल्डकप ट्रॉफी जिंकल्यावर भारतात क्रिकेटची क्रेज आणखीन वाढलेली. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामने आणि २२५ वन डे सामना खेळले असून यामध्ये त्यांनी अनुक्रमे ५२४८ धावा (८ शतके, २७ अर्धशतके) आणि ४३४ विकेट तर ३७८३ धावा करताना १ शतक आणि १४ अर्धशतके आणि २५३ विकेट घेतल्या आहेत.
Yashasvi Jaiswal : ज्याची भीती तेच घडलं! यशस्वी जयस्वालला भांडणं पडली महागात, ICCची आतापर्यंतची मोठी कारवाईइंग्लंडचे महान खेळाडू इयान बॉथम यांनी सर ही उपाधी देण्यात आली आहे. ऑल राऊंडर असलेल्या बॉथम यांनी १०२ कसोटी आणि ११६ वनडे सामना खेळले असून १६ वर्षांच्या करियरमध्ये नो बॉल फेकला नाही. त्यासोबतच ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डेनिस लिली वेगवान गोलंदाज होते, त्यांनीही ७० कसोटी, ६३ वनडे खेळताना अनुक्रने ३५५ आणि १०३ विकेट नावावर केल्या असून कधीही नो बॉल टाकला नाही.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा