पुणे, संभाजीनगरमध्ये नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:राज्यस्तरीय कार्यक्रमात 300 हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आळंदी येथे एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार आळंदी नगर परिषदेने फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर…
