सटाण्यात खड्ड्यांचे जलपूजन करून राष्ट्रवादीची स्वखर्चाने रस्ता दुरूस्ती:1 ऑगस्टपर्यंत काम सुरून झाल्यास रास्ता रोको
साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जीवरील सटाणा शहरातून जाणारा जिजामाता उद्यान ते सटाणा बसस्थानकादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २७) तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली…
