IPO Listing Alert: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनच छोटसं पाऊलही चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दशकात भारताच्या शेजारी देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती केली असून आता एका चिनी कंपनीने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच शांघाय स्टॉक एक्सचेंजवर एका चिप उत्पादक कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आणि लिस्टिंगनंतर शेअरमध्ये 500% वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले.

पदार्पणातच चिनी आयपीओची फिनिक्स भरारी
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनी चिप उत्पादक कंपनी CXMT कॉर्पने आयपीओसाठी 8.66 युआनचा प्राइस बँड निश्चित केला होता आणि शेअर्स शांघाय स्टॉक एक्सचेंजवर मोठ्या प्रीमियमवर लिस्ट झाले. इतकेच नाही तर लिस्टींगनंतर CXMT च्या शेअर्सनी जवळपास 500 टक्क्यांनी मोठ्या तेजीसह उडी घेतली आणि 55.02 युआनच्या उच्चांकावर पोहोचले. पण नंतर ही तेजी मंदावली तरीही या चिप कंपनीचे शेअर्स 465.82% वाढीसह 49 युआनवर बंद झाले.
Tatkal Ticket New Rules: तात्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम, 1 ऑगस्टपासून सर्वसामन्यांची मोठी अडचण दूर होणार; काय आहे नवीन प्रोसेस?
स्मार्टफोन आणि कम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या DRAM चिप्सची उत्पादक कंपनी चांग शिन मेमरी टेक्नॉलॉजीज – CXMT – ने आशियातील सर्वात मोठ्या आयपीओतून 8.6 अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 82,500 कोटी रुपये उभारले.
अशाप्रकारे, CXMT ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगपासून प्रचंड नफा मिळवून देणारी कंपनी ठरली असून चीनच्या सर्वात मोठ्या मेमरी चिप निर्मात्याने अंदाजे 3.3 ट्रिलियन युआन ($487 अब्ज) चे बाजारमूल्य गाठले, ज्यामुळे मेनलॅन्ड चीनमधील सर्वात मौल्यवान सूचीबद्ध कंपनी बनली.
CXMT कंपनीचा व्यवसाय काय
2016 मध्ये झू यिमिंग यांनी ही कंपनी सुरू केली. चीनमधील आन्हुई प्रांतातील हेफेई येथे या कंपनीचा मुख्यालय असून ही कंपनी DRAM म्हणजे डायनॅमिक रँडम ऍक्सेस मेमरी चिप्सचे उत्पादन करते, ज्यांचा स्मार्टफोन, कम्प्युटर, सर्व्हर, एआय सिस्टीम, एआय डेटा सेंटर्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापर केला जातो.
त्याचवेळी, लक्षवेधी गोष्ट म्हणजे की गेल्या काही दिवसांपासून जगभरातील, विशेषतः जपान आणि दक्षिण कोरियाच्या आयटी शेअर्समध्ये मोठी उलथापालथ आणि जोरदार विक्री सुरू होती, पण दबावाच्या काळातही CXMT ने दमदार सुरुवात केली आहे.
LIC Pension Plan : रिटायरमेंटची चिंता सोडा! एलआयसी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दरमहा 20000 मिळवण्याची हमी;‘स्मार्ट’ पॉलिसी आहे तरी काय?
पुरवठ्यापेक्षा खूप जास्त मागणीमुळे शेअरमध्ये पहिल्याच दिवशी ऐतिहासिक तेजी आल्याचे विश्लेषकांचे म्हणणे असून शेअरच्या दमदार लिस्टिंग आणि त्यानंतर झालेल्या तेजीमुळे यिमिंगच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

