Headlines

Oatzempic weight loss drink truth and oats drink benefits explained scientifically; ओट्झेंपिक ड्रिंकने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य


सोशल मीडियावर व्हायरल झालेला ‘Oatzempic’ ट्रेंड वजन कमी करण्यासाठी जादुई उपाय म्हणून सादर केला जात आहे. ओट्स, पाणी आणि लिंबापासून तयार होणारे हे ड्रिंक Ozempic औषधाचा स्वस्त पर्याय असल्याचा दावा केला जातो. मात्र, तज्ज्ञांच्या मते Oatzempic आणि Ozempic यांचा वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही संबंध नाही. ओट्समधील फायबरमुळे काही काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि कॅलरी कमी घेतल्याने वजन घटू शकते. पण दीर्घकाळ केवळ अशा फॅड ड्रिंक्सवर अवलंबून राहणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या Oatzempic ट्रेंडमागचे सत्य, फायदे, मर्यादा आणि तज्ज्ञांचे मत.

oatzempic weight loss drink
oatzempic weight loss drink
आजकालच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यात ‘फिट’ दिसणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे ही प्रत्येकाचीच एक मोठी इच्छा बनली आहे. लग्नकार्य असो, एखादा सण असो किंवा ऑफिसमधील प्रेझेंटेशन, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुंदर आणि सुटसुटीत दिसायचे असते. पण वाढलेले वजन आणि सुटलेले पोट अनेकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. याच चिंतेचा फायदा घेत सोशल मीडिया युगात दररोज नवनवीन डाएट प्लॅन्स आणि ‘मिरॅकल ड्रिंक्स’चे ट्रेन्ड्स व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक शब्द धुमाकूळ घालत आहे, तो म्हणजे ‘ओट्झेंपिक’ (Oatzempic).

हे ड्रिंक प्यायल्याने अवघ्या काही दिवसांत वजन वेगाने कमी होते असा दावा अनेक इन्फ्लुएन्सर्स करत आहेत. जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित आरोग्य जर्नल The Lancet Regional Health अहवालानुसार, जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत असून लोक कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय ‘क्विक फिक्स’ किंवा सोपे उपाय शोधत आहेत, ज्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. अनेकदा आपण स्वतःला आरशात पाहतो आणि वाढलेल्या वजनामुळे आपला आत्मविश्वास ढासळू लागतो. वजन कमी करण्यासाठी लोक उपाशी राहतात, आरोग्याशी तडजोड करतात आणि शेवटी सोशल मीडियावरील अशा फॅड डाएट्सच्या आहारी जातात. म्हणूनच, हा ‘ओट्झेंपिक’ ट्रेंड नक्की काय आहे, तो कसा बनवला जातो आणि त्यामागे खरंच काही विज्ञान आहे की हा केवळ एक मार्केटिंगचा स्टंट आहे, हे सत्य रिसर्चच्या आधारावर समजून घेणे गरजेचे आहे.

‘ओट्झेंपिक’ (Oatzempic) म्हणजे काय आणि हा ट्रेंड आला कुठून?

'ओट्झेंपिक' (Oatzempic) म्हणजे काय आणि हा ट्रेंड आला कुठून?

ओट्झेंपिक हा कोणतीही फार्मास्युटिकल कंपनी किंवा डॉक्टरांनी तयार केलेला औषधी फॉर्म्युला नाही, तर हा दोन शब्दांचा मेळ आहे: ‘ओट्स’ (Oats) आणि ‘ओझेंपिक’ (Ozempic). ओझेंपिक हे मुळात टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीचे एक वैद्यकीय इंजेक्टेबल औषध आहे, ज्याच्या वापरामुळे रुग्णांची भूक मंदावते आणि त्यांचे वजन वेगाने कमी होते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी ओझेंपिक या महागड्या आणि प्रिस्क्रिप्शन लागणाऱ्या औषधाला घरगुती पर्याय म्हणून ‘ओट्झेंपिक’ हे नाव दिले. ओट्सपासून बनवलेले हे पेय अगदी स्वस्त आणि घरच्या घरी तयार करता येत असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्या कोट्यवधी मध्यमवर्गीय लोकांमध्ये आणि तरुणांमध्ये याची क्रेझ वेगाने पसरली आहे. लोकांनी या पेयाचे आव्हान स्वीकारून आपले व्हिडिओ पोस्ट करणे सुरू केले आहे, ज्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत. मुळात, “Oatzempic” हे लोक घरी सहज बनवतात असे एक पेय आहे.

ओट्झेंपिक ड्रिंक बनवण्याची रेसिपी

ओट्झेंपिक ड्रिंक बनवण्याची रेसिपी

हा ट्रेंड इतका व्हायरल होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे ड्रिंक बनवणे अत्यंत सोपे आणि खिशाला परवडणारे आहे. Mayo clinic नुसार, हे पेय तयार करण्यासाठी खालील घटकांची आवश्यकता असते.

  • अर्धा कप रोल्ड ओट्स (Rolled Oats)
  • एक कप पाणी किंवा वनस्पती-आधारित दूध जसे की बदामाचे दूध
  • अर्ध्या लिंबाचा किंवा मोसंबीचा रस (Lime/Lemon juice)
  • चवीसाठी चिमूटभर दालचिनी पावडर, थोडे मध किंवा फळे घाला

हे सर्व घटक एकत्र करून मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये तोपर्यंत वाटून घ्या जोपर्यंत त्याचे स्मूद (Smooth, frothy) ड्रिंक तयार होत नाही. हे पेय दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किंवा सकाळच्या न्याहारीच्या म्हणजेच नाश्त्याच्या ऐवजी प्यायले पाहिजे. हा केवळ एक प्रकारचा ‘ओटमील शेक’ आहे, ज्याला लिंबाच्या रसामुळे थोडी आंबट चव येते, परंतु इंटरनेटवर याला एखाद्या जादुई काढ्यासारखे सादर केले जात आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कमी कॅलरीमध्ये पोट भरल्यासारखे वाटणारे एक ब्रेकफास्ट ड्रिंक तयार करणे हे आहे.

ओट्झेंपिक (Ozempic) औषधासारखे काम करते का?

ओट्झेंपिक (Ozempic) औषधासारखे काम करते का?

या प्रश्नाचे थेट आणि स्पष्ट उत्तर म्हणजे ‘नाही, मुळीच नाही!’ विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते, ओट्झेंपिक आणि मूळ ओझेंपिक औषधामध्ये जमिनी-आसमानाचा फरक आहे. UCLA Center for Human Nutrition च्या मते, ओझेंपिक हे एक वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित औषध आहे, जे शरीरातील ‘GLP-1’ (Glucagon-like peptide-1) या हार्मोन्सची नक्कल करते. हे हार्मोन थेट आपल्या मेंदूवर आणि पचनसंस्थेवर कार्य करून भूक पूर्णपणे मारून टाकते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते. याउलट, ओट्झेंपिक हे केवळ ओट्स आणि पाण्याचे मिश्रण आहे. हे पेय शरीरातील कोणत्याही हार्मोन्समध्ये बदल करत नाही किंवा ओझेंपिक औषधासारखी जैविक प्रक्रिया शरीरात घडवून आणत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची तुलना करणेच वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे.

वजन कमी करण्याबाबत विज्ञान काय सांगते?

वजन कमी करण्याबाबत विज्ञान काय सांगते?

जर लोक हे पेय पिऊन वजन कमी करत असल्याचा दावा करत असतील, तर त्यामागील नेमके विज्ञान काय आहे? ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीच्या Southern Cross University (2026 Research) ne स्पष्ट केले आहे की, ओट्समध्ये ‘बेटा-ग्लुकन’ नावाचा अत्यंत फायदेशीर विरघळणारा फायबर असतो. हा फायबर पाण्यात मिसळल्यावर पोटाच्या आत जेलीसारखा पदार्थ तयार करतो, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. सायन्सच्या नियमांनुसार, जेव्हा तुम्ही सकाळी ४००-५०० कॅलरीजचा जड नाश्ता (उदा. पोहे, उपमा, पराठे) वगळून केवळ १४० कॅलरीजचे हे ओट्सचे ड्रिंक पिता तेव्हा तुमच्या शरीरात ‘कॅलरी डेफिसिट’ म्हणजेच कॅलरीजची कमतरता निर्माण होते. शरीराला लागणाऱ्या कॅलरीज न मिळाल्यामुळे वजन कमी होते. हा फायदा ओट्सच्या कोणत्या जादुई गुणामुळे नाही, तर कमी कॅलरीज पोटात गेल्यामुळे होतो. असाच परिणाम तुम्ही सकाळी कोणत्याही कमी कॅलरीजच्या पदार्थांचे सेवन केलं तरीही दिसून येईल.

ओट्झेंपिकचे धोके आणि तज्ञांचे मत

ओट्झेंपिकचे धोके आणि तज्ञांचे मत

जरी ओट्स हे आरोग्यासाठी उत्तम आणि पौष्टिक असले, तरी केवळ या एकाच पेयावर अवलंबून राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. Diabetes Victoria च्या पोषणतज्ञांनी इशारा दिला आहे की, ओट्झेंपिक हे संपूर्ण जेवण नाही. यामध्ये शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे प्रोटीन (प्रथिने), निरोगी चरबी, विटामिन्स आणि मिनरल्स नसतात. जर तुम्ही रोज नाश्त्याऐवजी फक्त हेच पीत राहिलात, तर शरीरात कुपोषण आणि पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच, अचानक शरीरात फायबरचे प्रमाण वाढल्याने काहींना गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मिक्सरमध्ये ओट्स बारीक केल्यामुळे त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ (GI) वाढतो, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते. शाश्वत वजन कमी करण्यासाठी केवळ सोशल मीडियावरील ट्रेन्ड्सच्या मागे न धावता संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा अवलंब करणे हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे.

सायन्स काय म्हणतं?

सायन्स काय म्हणतं?

आजपर्यंत, या विशिष्ट ओटझेम्पिक पेयावर कोणीही खरा वैद्यकीय अभ्यास केलेला नाही. पोषण संशोधकांचे एकमत आहे की, ओट्स आणि फायबर आरोग्यासाठी चांगले आहेत, परंतु सकाळी लिंबूवर्गीय फळांसोबत ते एकत्र केल्याने वजन कमी करण्यासाठी काही विशेष फायदा होतो, याचा कोणताही पुरावा नाही. आपल्याला खात्रीने माहीत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ओट्समुळे पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि फायबरयुक्त आहारामुळे रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. ओट्समुळे वजन कमी होण्याचे फायदे अगदी सामान्य आहेत आणि ते सर्वसाधारणपणे आरोग्यदायी आहार व व्यायामासोबतच सर्वोत्तम काम करतात. यात कोणताही चमत्कारिक शॉर्टकट नाही.

आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 26, 2026, 09:39 PMMedically Reviewed byDr. Ankit Potdar
  • Jul 26, 2026, 09:39 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम