No evidence on who pushed Ketan Agarwal into Lohagad Gorge Pune Police ask court for lie detector test on Siya Goyal Crime News; ना प्रत्यक्षदर्शी, ना पुरावा; केतन अग्रवालला नक्की दरीत कोणी ढकललं? पुणे पोलिसांची कोर्टात धाव, केसला नवी दिशा देणारी मागणी
No evidence on who pushed Ketan Agarwal into Lohagad Gorge Pune Police ask court for lie detector test on Siya Goyal Crime News; ना प्रत्यक्षदर्शी, ना पुरावा; केतन अग्रवालला नक्की दरीत कोणी ढकललं? पुणे पोलिसांची कोर्टात धाव, केसला नवी दिशा देणारी मागणी
Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जबाब यापूर्वीच नोंदवण्यात आले आहेत, परंतु पुढील तपासासाठी ‘पॉलिग्राफ’ चाचणी आवश्यक असल्याचे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मुख्य संशयित असलेली त्याची नियोजित वधू सिया गोयल हिची ‘लाय-डिटेक्टर’ (पॉलिग्राफ) चाचणी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात धाव घेतली. केतनला दरीत कोणी ढकलले, हे सिद्ध करणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा उपलब्ध नाही; केवळ आरोपीच्या जबाबांशिवाय अन्य काहीही हाती लागले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
पॉलिग्राफ चाचणीची मागणी
न्यायालयाकडे परवानगी मागताना पोलिसांनी सांगितले की, सिया गोयल आणि सह-आरोपी चेतन चौधरी यांचे जबाब यापूर्वीच नोंदवण्यात आले आहेत. परंतु पुढील तपासासाठी ‘पॉलिग्राफ’ चाचणी आवश्यक आहे. या चाचणीमुळे तपासासाठी नवीन धागेदोरे मिळू शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
ज्या प्रकरणांमध्ये प्राथमिक किंवा दुजोरा देणारे पुरावे मर्यादित असतात, तिथे अनेकदा ‘पॉलिग्राफ’ चाचणीची मागणी केली जाते. मात्र या चाचणीचे निष्कर्ष न्यायालयात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत; परंतु त्यांचा वापर प्रामुख्याने तपास सुरु असताना तपासाच्या दिशा निश्चित करण्यासाठी किंवा महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी केला जातो.
केतनची लोहगडावरुन ढकलून हत्या
१८ जून रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं, परंतु अधिक तपासात त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने दरीत ढकलून हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणाने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. केतन-सियाचा साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते.
Uddhav Thackeray Call | श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे,ठाकरेंचा थेट शिवसैनिकांना फोन
सियाने केतनचा मोबाईल डेटा डिलीट केला?
याआधी, बुधवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली की, केतन अग्रवालचा मोबाईल त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यापूर्वी काही काळ सिया गोयलच्या ताब्यात होता; त्यामुळे त्या मोबाईलमधील कोणता पुरावा नष्ट केला गेला आहे किंवा त्यात फेरफार करण्यात आले आहेत का, याची तपासणी केली जात आहे.
तपासाचा भाग म्हणून, घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांनी १ जुलै रोजी लोहगड किल्ल्यावर चेतन चौधरीच्या उपस्थितीत गुन्ह्याच्या ठिकाणचे दृश्य पुन्हा उभे केले. यापूर्वी रविवारी सिया गोयलसोबतही अशीच प्रक्रिया राबवण्यात आली होती; त्यावेळी कड्यावरुन खाली पडण्याच्या घटनेची पुनर्निर्मिती करण्यासाठी तपास पथकाने एका डमी मानवाकृती पुतळ्याचा वापर केला होता.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा