Headlines

Nitin gadkari approached high court against social media posts about e 20; ई-20 पॉलिसीवरून प्रचंड बदनामी, कुटुंबीयांना फायदा झाल्याचा आरोप; नितीन गडकरींची थेट कोर्टात धाव


Ethanol Policy: “इथेनॉल मिश्रण धोरणाची अंमलबजावणी ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, गडकरी यांच्या मंत्रालयाच्या नव्हे”, असे हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे.

nitin gadkari e20
ई-20 पॉलिसीवरून प्रचंड बदनामी, कुटुंबीयांना फायदा झाल्याचा आरोप; नितीन गडकरींची थेट कोर्टात धाव(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रमेश खोकराळे, मुंबई: नीट पेपरफुटीनंतर देशात तरुणांचे प्रचंड जनआंदोलन उभे राहिले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. ई-20 पॉलिसीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबीयांचा फायदा करून दिल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ई-20 इथेनॉल कार्यक्रमातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना आर्थिक फायदा झाल्याचा दावा करणाऱ्या बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट आणि डीपफेक व्हिडिओंविरोधात गडकरी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने मेटा आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी त्यांना दिली आहे.

इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या नितीन गडकरी यांनी लेटर्स पेटंटच्या कलम १२ अंतर्गत हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. सोशल मीडियावरील काही पोस्ट आणि डीपफेक सामग्रीमध्ये ई-20 इथेनॉल कार्यक्रमातून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक लाभ मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, एकीकडे नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉल धोरणावरून गंभीर आरोप होत असताना त्यांनी आता कायदेशीर मार्ग अवलंबल्याचं दिसत असून त्यांच्याकडून आगामी काळात आरोप करणाऱ्यांविरोधात दिवाणी दावा दाखल केला जाणअयाची शक्यता आहे.

गडकरींवर उद्धव ठाकरेंचीही टीका

धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला होता. “जात, धर्म, पक्ष विसरून आपण देशभक्त भारतीय म्हणून इथे जमला आहात. ही गर्दी विष्णूचा अवतार आहे. नरेंद्र मोदी यांनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत; त्यांना देशाचे काम करायला सांगा. अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत; पेपरफुटीचे फायदे सांगतात. संरक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डा उर्फ रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात. पुढचा नंबर त्यांचाच आहे’ असं ते म्हणाले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा