Headlines

Niti Taylor : ‘एक्स बॉयफ्रेंडनं मला सिगारेटचा चटका दिलेला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग; म्हणाली, ‘तो मनोरुग्ण होता’


Niti Taylor : टीव्ही अभिनेत्री नीती टेलरनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं असून जळत्या सिगारेटनं त्यानं अभिनेत्रीला चटका दिलेला, असं तिनं सांगितलंय.

Niti Taylor On Her Ex Boyfriend
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – टीव्ही अभिनेत्री नीती टेलरनं प्राईम व्हिडिओच्या ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं. नीतीचा एक्स बॉयफ्रेंड तिचा खूप छळ करायचा. अभिनेत्रीनं सांगितलं की, त्याने एकदा सिगारेटनं तिच्या मांडीचा आतील भाग भाजला होता आणि त्यामुळे तिनं ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

मिनी माथूर, रुही दोसानी आणि देलबर आर्या यांच्याशी बोलताना, नीती म्हणाली, ‘माझ्या एक्स बॉयफ्रेंडने एकदा मला सिगारेटने चटका दिलेला. तो हिंसक आणि मनोरुग्ण होता. एका रात्री तो वेड्यासारखं वागायला लागला. त्याचा वाढदिवस होता. तो एक खूप वाईट अनुभव होता. त्याने मला कानशिलात लगावली आणि मी फक्त म्हणाला, ‘गुडबाय, नंतर भेटू.’
Maharashtra TimesTrupti Akkalwar : ‘कुणालाही पैसे काढायला द्यायचे नाहीत’, सिद्धूचा बँकेत फोन अन् बदललं अभिनेत्याच्या पत्नीचं आयुष्य; म्हणाली, ‘मी डिस्टर्ब झाले’

नीती टेलरचं लग्न आणि पती

नीतीनं, तिचा बॉयफ्रेंड परीक्षित बावासोबत ऑगस्ट २०१९ मध्ये साखरपुडा केला आणि एका वर्षानंतर, १३ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचं लग्न झालं. २०२४ मध्ये नीती आणि तिचा पती विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या. मात्र, अभिनेत्रीनं या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

नीती टेलर कोण आहे?

नीती एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असून ती ‘कैसी ये यारियाँ’ मधील नंदिनी मूर्ती, ‘गुलाम’ मधील शिवानी माथूर आणि ‘इश्कबाज’ मधील मन्नत कौर खुराना या भूमिकांसाठी ओळखली जाते. तिनं वयाच्या १५ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि २००९ मध्ये ‘प्यार का बंधन’ या शोमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. ‘कैसी ये यारियाँ’ या शोमुळे तिला ओळख मिळाली. पार्थ समथानसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांची जोडी टेलिव्हिजनवरील सर्वात आवडत्या ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक बनली. या शोमुळे ते घराघरात ओळखले जाऊ लागले. यानंतर, नीतीनं अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केलंय आणि ‘झलक दिखला जा १०’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. ती शेवटची २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे अच्छे लगते हैं २’ या शोमध्ये दिसली होती.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा