![]()
राजेश विनायकराव भुयार यांनी अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (डीडीआर) म्हणून पदभार स्वीकारला आहे. शंकर कुंभार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने नुकतीच काही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली होती, ज्यात भुयार यांचाही समावेश होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने त्यांना डीडीआरची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी भुयार याच विभागात धामणगाव रेल्वे येथे सहायक निबंधक म्हणून कार्यरत होते. सहकार विभागाचे उपसचिव नितीन गायकवाड यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. भुयार यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या नव्या पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे सामूहिक स्वागत केले.
Source link
राजेश भुयार अमरावतीचे नवे जिल्हा उपनिबंधक:शंकर कुंभार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती
