Headlines

Nirav Modi: फरारी नीरव मोदी अजूनही ब्रिटनमध्येच का? UK माजी गृहमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त – former uk home secretary priti patel appalled as nirav modi remains in uk despite extradition order


Nirav Modi: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ब्रिटनमध्ये राहिलेल्या भारतीय नागरिकांना परत स्वीकारण्याच्या मुद्द्यावर भारत कठोर भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नीरव मोदी
नीरव मोदी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, लंडन: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी अजूनही ब्रिटनमध्ये असल्याबद्दल ब्रिटनच्या माजी गृहमंत्री आणि भारतीय वंशाच्या नेत्या प्रीती पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘नीरव मोदी अजूनही येथे आहे, हे पाहून मी स्तब्ध आणि भयभीत झाले आहे,’ असे पटेल यांनी म्हटले आहे.

एप्रिल २०२१मध्ये ब्रिटनच्या गृहमंत्री असताना प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. न्यायालयात प्राथमिकदृष्ट्या खटला सिद्ध झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला होता. सध्या त्या हुजूर पक्षाच्या ‘शॅडो परराष्ट्रमंत्री’ आहेत. ‘द डेली टेलिग्राफ’च्या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या पॉडकास्टमध्ये पटेल यांनी म्हटले, की ‘ब्रिटनकडून नीरव मोदीचे प्रत्यार्पण न झाल्याने भारतीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.’

Maharashtra TimesUS India Conflict: अमेरिकेचे तीन प्रहार, इराणचा आयकॉनिक टॉवर जमीनदोस्त; भारताचे अब्जावधी रुपये धोक्यात
५५ वर्षीय नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे दोन अब्ज डॉलरच्या घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात तो भारताला हवा आहे. ब्रिटनमधील त्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपले असून, फ्रान्समधील युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्समध्ये केलेली अखेरची विनंतीही फेटाळली गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे. ‘सन २०१९ ते २०२२ या काळात टोरी सरकारमध्ये गृहमंत्री असताना या प्रकरणामुळे भारताशी व्यवहार कठीण झाले होते,’ असे पटेल यांनी सांगितले.

Maharashtra TimesCrorepati Stock: शेअर कसला हा तर अस्सल सोनं! 12 पैशांचा स्टॉक पोहोचला 48 रुपयांवर, लाखभर रूपये गुंतवणारे झाले करोडपती
‘नीरव मोदी भारतातील तुरुंगात असायला हवा होता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथे शिक्षा भोगत असायला हवा होता. ब्रिटनचे प्रत्यार्पण कायदे यासाठीच आहेत,’ असे पटेल यांनी सांगितले.

आपली व्यवस्था योग्य आणि न्याय्य पद्धतीने काम करीत असती, प्रक्रिया आणि कारणांच्या गर्तेत अडकली नसती, तर तो या देशात नसता. तो अजूनही येथे आहे, याचा मला खरोखरच धक्का बसला आहे. त्यामुळे भारत सरकारला आमच्याबरोबर काम करण्याबाबत खूपच निराशा वाटत असावी, असे मला वाटते. –– प्रीती पटेल, माजी गृहमंत्री, ब्रिटन

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा