भारतात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहन दंड आकारण्यात आला आहे. सरकारने 1 मार्च 2025 पासून हे नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत. जर तुम्ही नवीन नियम पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार नाही तर तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षा देखील होतील.

वाहतूक नियम मोडल्याचा दंड भरला नाही तर काय होईल? भ्रमात राहू नका..वाचा नवीन नियम:
| गुन्हे | जुने दंड | नवीन दंड |
| सीटबेल्टशिवाय वाहन चालवणे | ₹100 | ₹1,000 |
| ट्रिपल सीट प्रवास करणे | ₹100 | ₹1,000 |
| हेल्मेटशिवाय वाहन चालवणे | ₹100 | ₹1,000 किंवा 3 महिने लायसन्स जप्त |
| विमा नसलेले वाहन चालवणे | ₹200-₹400 | ₹2,000 (पहिल्यांदा), ₹4,000 (दुसऱ्यांदा) किंवा 3 महिने तुरुंगवास |
| धोकादायकपणे वाहन चालवणे | ₹500 | ₹5,000 |
| अतिवेगाने वाहन चालवणे | ₹500 | ₹5,000 |
| वाहतूक सिग्नलचे उल्लंघन | ₹500 | ₹5,000 |
| वाहन चालवताना मोबाईल वापरणे | ₹500 | ₹5,000 |
| ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे | ₹500 | ₹5,000 |
| आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे | ₹1,000 | ₹10,000 |
| PUC शिवाय वाहन चालवणे | ₹1,000 | ₹10,000 किंवा 6 महिने तुरुंगवास |
| दारू पिऊन वाहन चालवणे | ₹1,000-₹1,500 | ₹10,000 किंवा 6 महिने तुरुंगवास |
| ओव्हरलोडिंग | ₹2,000 | ₹20,000 |
| अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे | ₹2,500 | ₹25,000 किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास, 1 वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द |
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे
जर तुम्ही दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करत असाल तर 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पूर्वी हा दंड फक्त 1,000 ते 1500 रुपयांच्या दरम्यान होता. जर तुम्ही पुन्हा असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला 15000 रुपये दंड आणि 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
हेल्मेट न घातल्याबद्दल शिक्षा
जर तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच तुमचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जाऊ शकतो. आधी हा दंड 100 रुपये होता. त्याचप्रमाणे, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल.
ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर
जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला 5000 रुपये दंड होऊ शकतो. आधी हा दंड 500 रुपये होता.
जर तुमच्याकडे परवाना नसेल तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल आणि जर तुमच्याकडे विमा नसेल तर 2000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच, तुम्हाला तीन महिने तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची शिक्षा देखील होऊ शकते. प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नसल्यास 10000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवासासह सामुदायिक सेवा देखील होऊ शकते. जर तुम्ही पुन्हा विम्याशिवाय पकडले गेलात तर तुम्हाला 4000 रुपये दंड भरावा लागेल.
ट्रिपल रायडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग
जर तुम्ही गाडीवर ट्रीप सीट जातांना पकडले तर, तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही डेंजरस ड्रायव्हिंग किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्याबद्दल 10,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल.
सिग्नल तुटणे आणि ओव्हरलोडिंग
नवीन नियमानुसार, सिग्नल तोडल्यास 5000 रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास 20,000 रुपये दंड भरावा लागेल.
अल्पवयीन मुलांसाठी नियम अधिक कडक
अल्पवयीन मुलांसाठी वाहतूक नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. जर एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर 25,000 रुपये दंड, 3 वर्षांचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि 25 वर्षांचे होईपर्यंत परवाना न देणे अशी शिक्षा होऊ शकते.

