Kia Cars Price Hike From April 2025: किआ इंडिया 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे. किआने आतापर्यंत भारतात 14.5 लाख वाहने विकली आहेत.

Kia India च्या पॉप्यूलर कार
जर तुम्ही पुढच्या महिन्यात किआ कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. सध्या, किआच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Syros आणि Sonet ची इंडियन मार्केटमध्ये खूप चांगली विक्री होत आहेत. तसे, किआ Seltos च्या मीड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगली मागणी आहे. बजेट एमपीव्ही सेगमेंटमधील Carens आणि प्रीमियम एमपीव्ही सेगमेंटमधील कार्निवल लिमोझिन देखील ग्राहकांना खूप आवडत आहेत. किआच्या प्रीमियम इलेक्ट्रिक कार देखील ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहेत. आता 1 एप्रिलपासून या सर्व किआ कार 3% ने महाग होणार आहे.
कमी किमतीत चांगल्या क्वालिटिवर फोकस: हरदीप ब्रार
किआ इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरदीप सिंग ब्रार म्हणाले, “आम्ही इंडियन मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटिचे मॉडेल्स लाँच करत आहोच, परंतू कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत, माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. सप्लाई चेन म्हणजे वस्तू बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळण्यात अडचण येते. त्यामुळे आम्हाला गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही कमी किमतीमध्ये चांगले मॉडेल्स लाँच करु.
‘ग्राहकांवर कमी भार टाकण्याचा प्रयत्न’
हरदीप ब्रार पुढे म्हणाले, ‘किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांना गैरसोय होईल हे आम्हाला समजते, परंतु हा निर्णय घ्यावा लागला जेणेकरून आम्ही आणखीन चांगल्या क्वालिटिचे मॉडेल्स इंडियन मार्केटमध्ये लाँच करु शकू.’ किआ ग्राहकांच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत कंपनी वाढीव खर्चाचा मोठा भाग स्वतः उचलेल, ज्यामुळे ग्राहकांवरचा भार कमी होईल.
किआ गाड्यांची मार्केटमध्ये चांगली विक्री
किआ इंडियाने भारत आणि इतर देशांमध्ये 14.5 लाख वाहने विकली आहेत. किआची Seltos कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. 6.9 लाखांहून अधिक Seltos कार विकल्या गेल्या आहेत. त्यानंतर Sonet आहे जिचे 5 लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत, Carens चे 2.32 लाखांहून अधिक युनिट्स विकले जातात आणि कार्निव्हलचे 15,000 पेक्षा जास्त युनिट्स विकले गेले आहेत.

