Nepal Flood Emotional Story of Tourists Returning: नेपाळहून आलेल्या पर्यटकांचे रविवारी पहाटे नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी घरी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांत २६ ऑगस्ट रोजी पहाटे आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये विध्वंस झाला, तर अनेकांचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील १०६ पर्यटकांचा परतीचा मार्ग बंद झाला. पुढे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. पैसेही संपत आले होते. या वेळी समूहातील सुनंदा गावंडे यांनी आमदार प्रवीण दटके यांच्याशी संपर्क साधला. दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली.
Nepal Flood : ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’; नेपाळमधून 37 जणांचा गृप मुंबईत परतला, पोहोचताच कुटुंबीयांना पाहून ढसाढसा रडले, भयावह आपबिती सांगितलीयानंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधून धीर दिला. स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. पर्यटकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मध्यस्थीने परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना बसने दानापूरपर्यंत आणण्यात आले. तेथून रेल्वेने नागपूरकडे रवाना करण्यात आले.
‘शनिवारी सकाळी ७.३० वाजता आम्ही पटण्याहून ट्रेनने निघालो आणि रविवारी पहाटे ४.३० वाजता सुखरूप नागपुरात पोहोचलो’, असे श्रीधराचार्य स्वामी महाराज यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. चार पर्यटक शुक्रवारीच नागपुरात परतले होते.
Devendra Fadnavis: मुस्लिम नकोसे असणारा खरा हिंदू नाही; मोहन भागवतांची अमेरिकेत भूमिका, फडणवीसांनीही केलं समर्थन, हिंदुत्वाविषयी काय म्हणाले?ज्येष्ठ महिलेवर काठमांडूत उपचार
या धार्मिक पर्यटनादरम्यान नरेंद्रनगर येथील निर्मला पांडे यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीमुळे त्यांना परत आणणे शक्य नसल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. त्यांचा नातू विमानाने काठमांडूला पोहोचला असल्याचे श्रीधराचार्य स्वामी महाराज यांनी सांगितले.

