Headlines

सेंद्रिय, नैसर्गिक पद्धतीने शेती करा:मेंढोळदे येथे केळी पिकाची शेतीशाळा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎




मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळदे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ अंतर्गत रविवारी केळी पिकाची विशेष शेतीशाळा पार पडली. या प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने केळीची शेती करण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेला गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुक्ताईनगर येथील कृषी तंत्र विद्यालयाचे पंकज घटे यांनी केळी पिकामध्ये रासायनिक खतांचा अनावश्यक व अतिरिक्त वापर टाळून सेंद्रिय शेती अवलंबण्याचे महत्त्व पटवून दिले. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, उत्पादन खर्चात बचतीबाबत सांगितले. उपस्थित महिला व पुरुष शेतकऱ्यांनी केळी पिकातील विविध समस्यांवर मार्गदर्शकांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. कृषी विभागाने असे शेतकरी उपयोगी प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या उपयुक्त शेतीशाळेबद्दल केळी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले. सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विनोद सैदाणे व पंकज घटे. ‘आत्मा’चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद सैदाणे यांनी शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत यांसारख्या विविध नैसर्गिक व जैविक निविष्ठा घरच्या घरी तयार करून त्यांचा शेतीत कसा वापर करावा, याचे मार्गदर्शन दिले. नैसर्गिक निविष्ठा तयार केल्यास महागड्या रासायनिक खते व औषधांवरील अवलंबित्व कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत