वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडू पोलिसांनी माजी मुख्यमंत्री आणि डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेत कपात करून ‘झेड-प्लस’वरून ‘झेड’ श्रेणीत आणली आहे. नवीन व्यवस्थेनुसार स्टॅलिन यांना कडक पोलीस संरक्षण मिळत राहील. नव्या बदलानुसार त्यांच्या ताफ्याच्या पुढे, मध्यभागी आणि मागे सुरक्षा पथके तैनात केली जातील. या सुरक्षा कवचामध्ये एक पायलट, एस्कॉर्ट, बॅकअप आणि जवळच्या संरक्षणासाठीची वाहने यांचा समावेश असणार आहे. ही सुरक्षाव्यवस्था प्रवासादरम्यान आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे संरक्षण करणार आहे. राज्य सचिवालयातील कोअर सेल सुरक्षा विभागाने केलेल्या संरक्षित राजकीय नेत्यांच्या धोक्याच्या मूल्यांकनानंतर हा निर्णय घेतला.
