Indian Origin Couple Saved Own Life In Nepal Flood: नेपाळच्या महापुरात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक अजूनही बेपात्त आहे. बचाव पथक अजूनही बेपत्ता असलेल्यांचे शोध घेत आहेत. या महापुरातून एका भारतीय वंशाच्या जोडप्याने आपला जीव वाचवला. त्यांनी आपला जीव कसा वाचवला याचा थरारक अनुभव सांगितला आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाताना, लोक किंचाळताना आणि रडताना दिसल्याचे त्यांनी सांगितले.

महापुरात भारतीय वंशाचा वाचला जीव
भारतीय वंशाचे अंजना राजा आणि त्यांचे पती पट्टाभिरामन् वेंकटेशन हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को बे येथे राहतात. हे दोघे कैलास मानसरोवर येथे त्यांच्या पहिल्याच तीर्थयात्रेला आले होते. चीनच्या सीमेजवळील ‘तिमुरे’ या नेपाळी गावातून दोघे बसने प्रवास करत होते. तेव्हा पाण्याचा आणि चिखलाच्या मलब्याच्या प्रचंड मोठा ढीग येत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी जगण्याच्या केवळ इच्छेपोटी त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. त्यांच्या टूर बस मधील केवळ हेच जोडपे नाही तर इतर सार्वजणंही वाचले.
कसा वाचवला जीव?
अंजना राजा आणि त्यांचे पती कैलास मानसरोवर येथे त्यांच्या पहिल्याच तीर्थयात्रेवर गेले होते. त्यांनी आपला थरारक अनुभव सांगितलंय. “आम्ही दोघे टूर बसमध्ये बसलो होता. त्यावेळी एक प्रचंड मोठी पाण्याची भिंत आमच्याकडे वेगाने येत असल्याची दिसली. ती भिंत जवळपास ६० ते ७० फूट उंच होती. सुरुवातीला आम्हाला असे वाटले की भूकंप किंवा जंगलाला आग लागली आहे. बसचे ड्रायवर आणि कंडक्टर बस सोडून पळाले आहे. तेव्हा समजले की काहीतरी भयंकर घडणार आहे. त्यावेळी मला असे वाटले ‘आपला मृत्यू निश्चित आहे’. मात्र मनात जगण्याच्या तीव्र जिद्दीतून त्यांनी आपल्या पतीचा कॉलर पकडला आणि म्हणाली पळा. आम्ही दोघांनी बसमधून बाहेर उडी मारली. काही सेकंदात त्यांनी तब्ब्ल ५०० पायऱ्या चढल्या. त्यावेळी त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. मला पट्टाभिरामन् वेंकटेशन हे माझ्या आयुष्यात पाहिजे होते”, असे राजा म्हणाले.
Nepal Flash Flood : मृतदेहांची मोजणी संपलेली नाही अन् लूट सुरू; कुणी तिजोऱ्या लुटतायेत तर कुणी मृतांवरचे सोने-चांदी!
“आम्ही बस मधून खाली उडी टाकली कोणताच विचार न करता आम्ही वेगाने उंच भागाकडे धावलो आणि वर चढू लागलो. वाटेत आम्हाला घरे कोसळताना दिसली. पुराच्या पाण्यात वाहून जाताना, लोक किंचाळताना आणि रडताना दिसले. वर चढणे हे धोकादायक होते, मात्र आम्ही काही सेकंदात जवळच्या डोंगराच्या सपाट भागापर्यंत पोहोचलो. ५०० पायऱ्या आम्ही वेगाने धावत चढलो. ते ठिकाण इतके उंचावर होते की आम्ही तिथे कसे चढलो, हे मलाही समजत नाहीये”,असे राजा यांनी सांगितले.
व्यंकटेश म्हणाले, “त्यांनतर आम्ही स्थानिक रहिवासी आणि इतर पर्यटकांसोबत एका शेळीच्या गोठ्यात रात्र काढली. दुसऱ्या दिवशी, त्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या महापुरातून आम्ही वाचलो यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते.”
हजारोहुन अधिक लोक अजूनही बेपत्ता
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात ६०० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ५१७ परदेशी नागरिकांसह २,४२६ लोक बेपत्ता आहेत. या पुरामुळे एकूण ९० अमेरिकन नागरिक बेपत्ता आहेत असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले. तिबेटच्या बाजूला, सरकारी प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू आणि ५०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बेपत्ता नागिकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे. चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या नागरिकांचा बेपत्ता विदेशी नागरिकांमध्ये समावेश आहे. भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या काठावरील वस्त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

