- Marathi News
- Opinion
- Pandit Vijayshankar Mehta: Need Spiritual Awakening Amidst Rising Religious Clash
6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

बाजाराच्या जगात असे म्हटले जाते की, जग हे मुलांचे अर्थशास्त्रआहे. म्हणूनच बाजाराने मुले, तरुण व महिलांना नियोजनबद्ध पद्धतीनेआपला ग्राहक आणि हळूहळू हे ग्राहक स्वतः बाजारातील वस्तू बनले.आता हाच विचार कुटुंबाला लागू केला, तर कुटुंबाचे अर्थशास्त्र मुलांवरअवलंबून असते. कुटुंबाचे भविष्य पिढ्यान््पिढ्या या मुलांमुळेच चालते.
बाहेरच्या जगात रोबोट हळूहळू वर्चस्व गाजवत आहेत. रोबोट ही अशीप्रवृत्ती आहे, जी माणसाच्या मनातील भावना शोषून घेईल. याचे धोकेकुटुंबातही दिसतील. कुटुंबात लोक जिवंत असूनही रोबोटसारखेवागतील. आई-वडील मुलांना रोबोटसारखे घडवत आहेत.
एक दिवसअसा येईल की रोबोट इतका अनियंत्रित होईल की तो माणसाच्यानियंत्रणात राहणार नाही. याचा सर्वात मोठा धोका कुटुंबात हा दिसूनयेईल की, येणाऱ्या पिढ्या कुटुंबाला ओझे मानतील. आपल्या कुटुंबांतधार्मिक कल वाढला आहे, परंतु आध्यात्मिक जागृतीही व्हायला हवी.ज्या कुटुंबाने आत्म्याचा स्वाद, आनंद अनुभवला त्या कुटुंबाचेअर्थशास्त्र दूरगामी असेल.
