shoaib akhtar brother funeral : पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्यविधीला दहशतवादी आल्याने खळबळ उडाली आहे. २६/११ दहशतवादी हल्ला आणि पहलगाम हल्ल्याचा कथित सूत्रधारही तिथे होता. त्यामुळे आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत म्हणणारं पाकिस्तान उघड पडलं आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘रावळपिंड एक्सप्रेस’ म्हणून पाकिस्तानचा ओळखला जाणारा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब अख्तरचा मोठा भाऊ शाहिद अख्तर याचे निधन झाले होते मात्र त्याच्या भावाच्या अंत्यविधीसाठी लष्कर ए तोयबा या दहशतवादी आणि पहलगामच्या भ्याड हल्लामागचा कथित सूत्रधार या संघटनेचा उपप्रमुख सैफुल्ला कसूरी उपस्थित होते. सैफुरी लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख आणि पहलगाम हल्लाचा मुख्य सूत्रधार मानला जातो. त्यासोबतच २६/11ला मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लामागचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या दहशतवादी संघटनेतील अनेक राजकीय चेहरेसुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं दिसून आलं. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.
पहलगामच्या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू पाणी करार रद्द केले. त्यानंतर कसुरीने भारतावर जल दहशतवाद केल्याचा आरोप केला होता. इतकंच नाहीतर त्याने २६/११ सारखा आणखी एक हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली होती. फेब्रुवारीमध्ये एक व्हिडीओ समोर आला होता. जमीन, हवेत किंवा समुद्र शत्रूला कोणतीही जागा ठेवणार नसल्याचं कसुरी म्हणाला होता. IND vs IRE : आयर्लंडकडून वर्ल्ड कप विनर भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव, 2 खेळाडूंनी फिरवली संपूर्ण मॅच शोएब अख्तरला मोठा भाऊ गेल्याने धक्का बसला आहे. कारण शोएबल त्याच्या मोठ्या भावाने सुरूवातीपासून त्याला प्रोत्साहन देत संपूर्ण प्रवासात साथ दिली होती. शाहिद अख्तर म्हणजे शोएबचा भाऊ घरातील मोठा असल्याने त्यांच्या घरातील अनेक निर्णय हे त्याला विचारून घेतले जात होते. २०१४ मध्ये शोएबच्या लग्नाबाबतची माहिती शाहिदनेच सर्वांना दिली होती. २०२१ मध्ये आईच्या निधनानंतर पाच वर्षात आता भाई गेल्याने शोएबवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा