Navi Mumbai Apollo Hospital Polytrauma Surgery : जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात करत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या 50 हून अधिक डॉक्टर्सच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णाला मिळालं नवं जीवन.

नेमकं प्रकरण काय?
अपघातानंतर रुग्णाला सुरुवातीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथे पोहोचल्यावेळी त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी होता आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं की, शस्त्रक्रियेसाठी आर्थिक औपचारिकता पूर्ण होण्याची वाट पाहता येणार नाही. त्यामुळे आपत्कालीन कक्षात पोहोचल्यानंतर अवघ्या 45 मिनिटांत त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं.
Nashik Crime : वर्षभरापूर्वी सात जन्माच्या आणाभाका, हसत्या-खेळत्या संसारात कुरकुर, कंटाळून नवऱ्याचं टोकाचं पाऊल; अनिकेतच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप
अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी विभागाचे आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रादेशिक संचालक डॉ. नितीन जगासिया यांच्या नेतृत्वाखालील ट्रॉमा टीमने तपासणी केली असता, रुग्णाच्या श्रोणि, मांडीचे हाड, दोन्ही हात आणि मांडीच्या भागात फ्रॅक्चर्स आढळले. रुग्णाचा उजवा हात गंभीररीत्या चिरडला गेला होता आणि त्यामध्ये नाडी जाणवत नव्हती. त्यामुळे तो हात वाचणार नाही असं मोठं आव्हान निर्माण झाले. या दुखापतींसोबतच, सीटी एओर्टोग्राम तपासणीत सर्वात जीवघेणा निष्कर्ष समोर आला. अपघातातील तीव्र धक्क्यामुळे शरीरातील मुख्य रक्तवाहिनी असलेली महाधमनी फुटली होती. (महाधमनी ही शरीरातील मुख्य रक्तवाहिनी आहे).
उजव्या हाताला गंभीर दुखापत
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील ट्रॉमा, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जनचे सल्लागार डॉ. समीर चौधरी आणि त्यांच्या टीममधील तीन ऑर्थोपेडिक सर्जननी फ्रॅक्चर्स स्थिर करण्यासाठी आणि श्रोणिची अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी सुमारे अडीच तास परिश्रम केले. त्यांच्यासोबतच, त्याचवेळी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जनचे सल्लागार डॉ. चारुदत्त चौधरी आणि त्यांच्या टीमने उजव्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीतून अवयव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याचबरोबर, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. ब्रजेश कुमार कुंवर यांच्या नेतृत्वाखालील कार्डिओव्हॅस्कुलर टीमने रुग्ण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच आपत्कालीन महाधमनी दुरुस्तीची योजना आधीच आखली होती आणि आवश्यक स्टेंटचा आकार निश्चित करण्यात आला होता.
Nagpur News : नागपुरात वर्दळीच्या ठिकाणी इमारतीचा काही भाग खचला, संकट पाहता महापालिकेने धोकादायक भाग पाडला
रुग्णाला सुमारे एक आठवडा आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आलं होतं. या काळात त्याला किडनीशी संबंधित गुंतागुंत झाली होती, ज्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. पुढील काही दिवसांत, त्यांच्या जखमांवर उपचार, व्हॅक्यूम-असिस्टेड क्लोजर (व्हीएसी) थेरपी आणि वारंवार ड्रेसिंग बदलणे यासोबतच श्रोणि आणि मांडीच्या हाडामध्ये प्लेट्स बसवण्यासाठी अंतर्गत फिक्सेशन शस्त्रक्रिया आणि सॉफ्ट-टिश्यू रिकन्स्ट्रक्शन आणि जखमा भरण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. तिसऱ्या आठवड्यापर्यंत, रुग्णाला अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलवण्यात आलं, जिथे फिजिओथेरपीच्या टीमने त्यांना बरं करण्याचे प्रयत्न सुरू केले. दुखापतीनंतर सुमारे सहा आठवड्यांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते व्हीलचेअरच्या मदतीने फिरू शकत होते. आता सातव्या आठवड्यात ते स्वतःहून उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना पूर्णपणे बरं करण्यासाठी त्यांची फिजिओथेरपी अजूनही सुरू आहे.
जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन सल्लागार डॉ. समीर चौधरी काय म्हणाले?
‘आम्ही हाताळलेल्या सर्वात आव्हानात्मक पॉलीट्रॉमा प्रकरणांपैकी हे एक होतं. रुग्ण जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा त्याला अनेक फ्रॅक्चर्स, श्रोणिची अस्थिरता आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती, त्यात नाडी जाणवत नव्हती, ज्यामुळे तो हात वाचवणं ही एक मोठी चिंता होती. ट्रॉमा केअरमध्ये वेळेला खूप जास्त महत्त्व असतं आणि प्रत्येक निर्णय त्वरित आणि अचूकपणे घ्यावा लागतो. उपचारादरम्यान, अनेक विशेषज्ञांनी फ्रॅक्चर्स स्थिर करण्यासाठी, अवयवाचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी आणि रुग्णाला बरे करण्यासाठी अगदी समन्वय साधून काम केलं. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णाला पुन्हा चालण्याच्या दिशेने प्रगती करताना पाहणं अत्यंत समाधानकारक आहे. या प्रकरणातून वेळेवर उपचार करणं तसेच बहु-विशेषज्ञ टीमने समन्वय साधून काम करणे किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित होतं’, असं डॉ. चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Rain Alert: महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट; मुंबईत काय स्थिती? 5 दिवसांसाठी IMD चा अंदाज
सीओओ तथा युनिट प्रमुख डॉ. किरण शिंगोटे काय म्हणाले?
‘हे प्रकरण बहुविद्याशाखीय आणि समन्वयित आरोग्यसेवेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 50 हून अधिक डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व 24 तास उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ सेवांच्या मदतीने एका जीवघेण्या अपघाताला आशादायी अणि प्रेरणादायी कहाणीत रूपांतरित केलं. अशा यशस्वी परिणामांमुळे हे सिद्ध होतं की, जेव्हा सर्वात जास्त गरज असते तेव्हा जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’.
Marathi Actress: हिरोईन होण्यासाठी गावाकडून मुंबईत आली, अलगद देह व्यापाराच्या जाळ्यात; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा एका रात्रीसाठी लाखोंना सौदा
अपोलो हॉस्पिटल्सबद्दल थोडक्यात माहिती
1983 मध्ये डॉ. प्रताप रेड्डी यांनी चेन्नई येथे पहिले अपोलो हॉस्पिटल सुरू केलं आणि अशाप्रकारे अपोलोनं आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवली. आज अपोलो हे जगातील सर्वात मोठं एकात्मिक आरोग्यसेवा केंद्र आहे अपोलोकडे 76 रुग्णालयांमध्ये 10,400 पेक्षा जास्त बेड, 7,113 पेक्षा जास्त फार्मसी, 308 क्लिनिक्स, 2,457 निदान केंद्रे आणि 800 पेक्षा जास्त टेलिमेडिसिन केंद्रे आहेत. हे जगातील अग्रगण्य हृदयरोगाच्या केंद्रांपैकी एक असून अपोलोनं 3,00,000 हून अधिक अँजिओप्लास्टी आणि 2,00,000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांना जगातील सर्वोत्तम उपचार मिळावेत म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणं आणि उपचार पद्धतींमध्ये संशोधन करुन आणि नाविन्यता आणून अपोलो सातत्यानं गुंतवणूक करत आहे. अपोलो कुटुंबातील 1,20,000 सदस्य अतुलनीय वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणि जग आणखी सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध आहेत.

