Nashik Water Crisis: गतवर्षीच्या तुलनेत (३९.०५५) साठा थोडा जास्त असला तरी, वाढत्या उष्णतेमुळे अनेक प्रकल्प तळ गाठत असल्याने आगामी मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक विभागातील २२ मोठ्या प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ३,७३१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. आजमितीस त्यात फक्त ४५.२१ टक्के साठा उरला आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५२.२७ टक्के पाणी शिल्लक आहे. भावली धरणातील उपयुक्त साठा शून्य टक्क्यांवर आला असून धरण कोरडे पडले आहे.
Nashik Crime: सत्तर कोटींची बनवेगिरी उघड; कार्यारंभ आदेशांवर कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही, गुन्हा दाखल
मध्यम ४७, तर लघु प्रकल्पात ३३ टक्के साठा
मध्यम व लघु प्रकल्पांचाही आधार सुटला केवळ मोठी धरणेच नव्हे, तर ग्रामीण भागाची तहान भागवणारे मध्यम आणि लघु प्रकल्पही आटत चालले आहेत. विभागातील ५५ मध्यम प्रकल्पांमध्ये ४७.७० टक्के साठा आहे. तर ४६२ लघु प्रकल्पांची अवस्था सर्वाधिक बिकट असून, तेथे केवळ ३३.३१ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात येथे २७.२ टक्के साठा होता, म्हणजेच यंदाही लघु प्रकल्पांनी जास्त लवकर तळ गाठला आहे.
Nashik Crime: देवळाली कॅम्पच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये चोरी; तब्बल 82 लाखांच्या इन्शुलिन इंजेक्शन्स गायब
प्रशासनासमोर नियोजनाचे आव्हान
एप्रिल अखेरीस ४२ टक्क्यांवर आलेल्या या साठ्यामुळे मे महिन्यातील बाष्पीभवन आणि वाढती मागणी लक्षात घेता प्रशासनाला पाणीकपातीचे किंवा आवर्तनाचे कडक नियोजन करावे लागणार आहे. विशेषतः ज्या धरणांचा साठा २० टक्क्यांच्या खाली गेला आहे, त्या क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भंडारदरा (अहिल्यानगर) ४४.३२ टक्के
मुळा (अहिल्यानगर) ४३.४ टक्के
वाघूर (जळगाव) ७४.३७ टक्के
हतनूर (जळगाव) ३९.४५ टक्के
Nashik News: ’मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडतेस,’ घरात शिरुन नाशकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रोडरोमियो गजाआड
नाशिक विभाग जलसाठा
प्रकल्प –संख्या –आजची टक्केवारी –गेल्या वर्षाची टक्केवारी
मोठे प्रकल्प –२२ –४५.२१ –३९.५०
मध्यम प्रकल्प –५५ –४२.७४ –४७.७०
लघु प्रकल्प –४६२ –३३.३१ –२७.०२
विभागनिहाय उपलब्ध पाणीसाठा
कोकण –४२.८३%
नाशिक –८७.९०%
पुणे –३२.४०%
मराठवाडा –४४.२५००
अमरावती –४७.६४%
नागपूर –४३.८३%

