Headlines

Nashik Tribal Student Uniform Case Ministry Officials and Representatives Stuck in Their Plans; आदिवासी विद्यार्थी गणवेश प्रकरण; अधिकारी अडकले आपल्याच जाळ्यात! 115 कोटींचे काम 34 कोटींत घेऊन ठेकेदाराची माघार


Nashik Tribal Student Uniform Scam : मंत्रालयातील ‘बाबूं’नी तयार केलेल्या प्लॅनमध्ये ते स्वत:च अडकले आहेत. नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी गणवेश घोट्याळ्यात मोठी माहिती समोर आली आहे.

Nashik Tribal Student Uniform Scam
नाशिक आदिवासी विद्यार्थी गणवेश प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
विनोद पाटील, नाशिक : आदिवासी विभागात गणवेश पुरवठ्याचे काम अंध व अपंगांच्या संस्थेला काम मिळू नये यासाठी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या ट्रॅपमध्ये स्वत: मंत्रालयातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच अडकल्याचे समोर आले आहे. सन २०२५-२६ वर्षासाठी राबविलेल्या निविदेत एका ठेकेदाराने ११५ कोटींचे काम ३४ कोटीत करून देण्याची तयारी दर्शवली. परंतु, संबधित संस्था आणि विभागाच्या वादात आपला ‘अभिमन्यू’ होईल या भितीने ठेकेदाराने निविदा दरात चक्क ५५ टक्के अधिक दरवाढीची मागणी करून विभागातील बाबूंना मामू बनवले. त्यामुळे ठेकेदार आणि विभागाच्या खेळात आदिवासी विद्यार्थी मात्र सलग दुसऱ्या वर्षी हक्कापासून वंचित राहिलेच्या चित्र आहे.

मंत्रालयातील ‘बाबू’ अडकले आपल्याच जाळ्यात

सोलापूर स्थित जगदंबा या संस्थेला एक कोटीपेक्षा अधिकचे काम घेता येत नाही असे सांगत, एका संस्थेने विभागालाच उच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु, उच्च ८ ऑगस्ट २०२५ रोजी संबधित संस्थेचा दावा फेटाळून उद्योग व उर्जा विभागाचे धोरण योग्य ठरवले. त्यामुळे संबधित संस्थेला काम मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, विभागाने ११५ कोटींची निविदा प्रक्रिया राबवली. या निविदा प्रक्रियेत पाच ठेकेदारांनी भाग घेतला. त्यात पदमचंद एम. जैन या फर्मने ३४ कोटी एवढ्या कमी रकमेचे देकार भरलेत. त्यामुळे विभागानेही ७५ ते ८० कोटी निधी वाचेल म्हणून संबधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला.
Maharashtra TimesNashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?

जगदंबा संस्थेची पुन्हा उच्च न्यायालयात धाव

परंतु, एवढ्या कमी दरात काम होणार नसल्याचा साक्षात्कार संबधित ठेकेदाराला होवून त्याने चक्क निविदा दरात ५५ टक्के वाढीची अशक्यप्राय मागणी करत काम करण्यास अप्रत्यक्ष नकार दिला. त्यामुळे कमी रकमेची निविदा भरून कामात खोळा घालण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. त्यात जगदंबा संस्थेने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे ठेकेदाराने दरवाढीची मागणी करत करारनामा करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांना वर्षभर गणवेश मिळालेच नाहीत. त्यामुळे मंत्रालयातील बाबूंनी रचलेल्या ट्रॅपमध्ये ठेकेदाराने त्यांना पद्धतशीरपणे अडकवले. त्यामुळे हा सगळा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश मिळू नये यासाठीच खेळला गेल्याचे चित्र समोर आले आहे.

महाटेक्स मार्फत ठेकेदारांना काम

उद्योग व उर्जा विभागाच्या धोरणानुसार दरनिश्चितीद्वारे निमशासकीय संस्थासह सामाजिक न्याय विभागात नोंदणी असलेल्या संस्थांना काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. दरनिश्चितीत गणवेशाचे दर जास्त असल्याचे सांगत, आदिवासी विभागाने विभागाने अंध व अपंग संस्थेकडून गणवेश खरेदीला नकार देतांना दुसरीकडे मात्र याच धोरणाच्या आधारे महाटेक्सवर मेहरबानी केली.विभागाने सन २०२५-२६ या वर्षात आश्रमशाळांसाठी १९ कोटींचे बेडींग साहित्याची खरेदी केली. महाटेक्स बेडींग साहित्य बनवत नसल्याने खासगी ठेकेदारामार्फत हा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे एक धोरण मात्र दोन संस्थांबाबत त्यांची अंमलबजावणी वेगळी असे बेगडी धोरण अधिकाऱ्यांनी स्विकारल्याचे चित्र आहे.
Maharashtra TimesNashik Crime: सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली; नाशिकमधील घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण

सर्वोच्च निकालाचा तीन आठवडे अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाने २१ मे रोजी संबधित संस्थेला कार्यारंभ आदेश देण्याचे आदेश दिलेत.त्यामुळे आदिवासी आयुक्त कार्यालयाने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावेत म्हणून तात्काळ प्रस्ताव आदिवासी मंत्रालयात पाठवला. परंतु, हा आदेश केवळ ‘एकलव्य’साठी असल्याचे सांगत,४९७ आश्रमशाळांना लागू होत नसल्याचा अंदाज बाबूंनी बांधला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने राज्याचे धोरण आणि सुधारीत दरनिश्चितीनुसार काम देण्याचे स्वातंत्र्य विभागाला दिले.त्यामुळे विभागाने सर्वोच्च निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी विधी व उद्योग विभागाकडे चेंढू टोलवला. या सर्व प्रक्रियेत जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी गेल्याने मुलांना गणवेशाविनाच शाळेत प्रवेश करावा लागला आहे.

आदिवासी विभागाचे पैसे वाचवण्याचा आमचा प्रयत्न

‘विभागातील सर्व गोष्टी आम्ही माध्यमांना सांगू शकत नाहीत. या सगळ्या प्रकारात विभाग आणि अधिकाऱ्याचा कोणताही दोष नाही. आदिवासी विभागाचे पैसे वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असं आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके असं म्हटलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा