Headlines

Nashik News: ‘नासाका’ पुन्हा वाऱ्यावर; संचालन करणाऱ्या पुण्याच्या कंपनीने गुंडाळला गाशा, जप्तीचीही नामुष्की – nashik sahakari sakhar kharkhana faces trouble sugarcane famers distress


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: दहा वर्षांहून जास्त काळ तत्कालीन संचालनाच्या भ्रष्ट कारभाराचा बळी ठरलेला नाशिक सहकारी साखर कारखाना कसाबसा तीन वर्षांपूर्वी सुरू झाला खरा; मात्र, अवघ्या दोनच वर्षांत माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून हा कारखाना चालविण्यासाठी घेतलेल्या पुणे येथील प्रसाद घावटे यांनी मध्येच गाशा गुंडाळल्याने यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याचा बॉयलर पेटणार नाही. यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत.

कारखान्याचे १४ लाखांचे वीजबिल देखील थकल्याने गेल्या चार महिन्यांपासून महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. कारखान्याची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा रात्रीच्या वेळी अंधारात सुरक्षा सांभाळत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची देखील आर्थिक फसवणूक झाली आहे. करारानुसार साखरेचे प्रतिपोते टॅगिंगची १०१ रुपयांप्रमाणे दोन गळीत हंगामाची कोट्यवधींची रक्कम देखील बँकेला न मिळाल्याने अखेर बँकेनेदेखील कंपनीवर करारनामा रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.

Girish Mahajan | रिक्षाचालकावर अन्याय, चहावाल्याचा दबाव?विरोधकांचा सवाल, महाजनांचा पलटवार

सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसाद घावटे यांनी नासाका चालविण्यास घेतल्यावर उसाला ३००१ रुपयांचा भाव जाहीर केला. प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना या दराप्रमाणे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. नासाका अशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्यात आल्याने शेतकरी, कामगार कमालीचे संतप्त झाले आहेत. नासाकाला एकट्या निफाड तालुक्यातून ३५ हजार मेट्रिक टन ऊस आला. मात्र या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. माजी आमदार अनिल कदम यांनी सुरुवातीला या प्रश्नावर घेतलेली आक्रमक भूमिका अचानक थंडावली. आमदार गोकुळ गीते यांनीही अगोदर आवाज उठविला. मात्र, त्यांनीही या शेतकऱ्यांकडे सोयीने दुर्लक्ष केले. हेमंत गोडसे यांनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सरोज आहिरे, हिरामण खोसकर, ॲड. माणिकराव कोकाटे यांनीही याकडे पाठ फिरविल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मालमत्ता जप्तीचे आदेश

नासाका सध्या अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेला आहे. ही कंपनी माजी खासदार हेमंत गोडसे यांची आहे. गोडसे यांच्या पुढाकारातून नासाका तीन वर्षांपूर्वी सुरू झाला. मात्र, गेल्या वर्षी गोडसे यांनी हा कारखाना पुण्याचे प्रसाद घावटे यांच्या हाती सोपवला. त्यानंतर ६० हजार ३०४ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन देखील नासाकाची आर्थिक घडी विस्कटली. शेतकरी, पुरवठादार, सुरक्षा कर्मचारी यांचे देणे वाऱ्यावर सोडून प्रसाद घावटे यांनी नासाकाला पुन्हा वाऱ्यावर सोडले.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली. त्यानंतर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडे चार वेळा सुनावणीही झाली. त्यानुसार एफआरपी २१८९.५० रुपयांप्रमाणे १३२०.३७. लाख रुपये देणे असताना कारखान्याने १०५८.२९ लाख रुपयांची देणी अदा केली. तर २ कोटी ६२ लाख ८ हजार रुपयांची देणी मात्र निर्णयानुसार अदा केली नाही. साखर आयुक्तांनी ही देणी १५ टक्के व्याजासह अदा करण्यास दिलेली १५ मे ही अखेरची मुदत कारखान्याने पाळली नाही. म्हणून साखर आयुक्तांनी कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश २५ जून रोजी दिले असून, या कार्यवाहीसाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी नेमले आहे.

Maharashtra TimesNashik Crime: लग्न जुळवण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा; भोंदूविरुद्ध गुन्हा, महिलेची 77 हजारांची फसवणूक, प्रकरण काय?उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्याही आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सासरे सासरे विठ्ठल कदम यांच्या सांगण्यावरून इच्छा नसतानाही पुण्याचे प्रसाद घावटे यांना गेल्या वर्षी नाशिक साखर कारखाना चालविण्यास दिला. त्यांनी कारखान्याचे वाटोळे केले. -हेमंत गोडसे, माजी खासदार

नासाका भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या कंपनीने जिल्हा बँकेची रक्कम अदा केली नाही. कंपनीने २८ ऑगस्टपर्यंत देणी न दिल्यास नासाका भाडेतत्त्वाचा कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा महिन्यातच दिला आहे.-संतोष बिडवई, प्रशासक, नासाका

‘नासाका’ची देणी

शेतकरी—- २ कोटी ६२ लाख

वीजबिल—- १४ लाख

कामगार—- १ कोटी

पुरवठा—- १ कोटी ५० लाख

जिल्हा बँक—- ५ कोटी ६० लाख

पंजाब नॅशनल बँक—- १ कोटी ७५ लाख

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत