Headlines

Nashik girl ends life due to love issue heartbreaking incident; तरुणाकडून आधी प्रेम, नंतर दुर्लक्ष; प्रेयसीने उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील घटना उघड


Nashik Girl Death: प्रेमात अपेक्षाभंग झाल्यानंतर तरुणीने थेट जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

nashik crime
तरुणाकडून आधी प्रेम, नंतर दुर्लक्ष; प्रेयसीने उचललं टोकाचं पाऊल(फोटोLipi)
नाशिक: प्रेमप्रकरणातून होणाऱ्या आत्महत्येच्या घटना वाढत असतानाच नाशिकमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील पेठ रोड परिसरात घडली असून याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरातील पेठ रोड परिसरात राहणारी पीडित मुलगी दहावी इयत्तेत शिकत असताना तिची संशयित दिशांत आहेर या तरुणाशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले. मात्र काही दिवस उलटल्यानंतर संशयित दिशांत याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. पीडित मुलीने याबाबत त्याला विचारणा केली असता, ‘त्याने माझा नाद सोड, ‘माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे’ असे सांगत तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

संशयित दिशांतचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीने देखील या पीडित मुलीची प्रत्यक्ष भेट घेऊन तू दिशांतचा नाद सोड, असा दबाव निर्माण करत तिला त्रास दिला असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने मागील आठवड्यात राहत्या घरी साडीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला फासलावून आपली जीवन यात्रा संपवली.

दरम्यान, याप्रकरणी आता म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये प्रेम प्रकरण आणि त्यातून आत्महत्येचा आलेख हा वाढताच असल्याने चिंता व्यक्त केली जात असून तरुण पिढीच्या समुपदेशनाची गरज अधोरेखित होत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा