Headlines

Nashik Bitco Hospital Killed of Sumit Pagare who was Out on Bail; नुकताच जामिनावर बाहेर आला, टपरीजवळ उभा असताना जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंड सुमित पगारेला दिवसाढवळ्या संपवलं


Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या बिटको रुग्णालय परिसरात एका तरुणाला निर्घृणपणे संपवण्यात आलं आहे.

Nashik Crime News
नाशिक सुमित पगारे मर्डर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून सुमित अरुण पगारे या युवकाची हत्या केल्याची घटना नाशिकरोड येथे रविवारी रात्री आठ वाजेदरम्यान बिटको रुग्णालय परिसरातील गोसावीवाडी येथे घडली. पगारे हाही कारागृहातून जामिनावर बाहेर आलेला हेाता. रविवारी रात्री पगारे एका टपरीजवळ उभा असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

दातीर यांच्यावर जीवघेणा हल्ला

प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेतेसाहेबराव दातीरयांच्यावर शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी रात्री दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी दातीर यांचे चारचाकी वाहन अडवून लाकडी दांड्याने वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर त्यांना वाहनातून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दातीर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दातीर हे शनिवारी रात्री विल्होळी येथून नाशिकच्या दिशेने चारचाकी वाहनातून जात होते. त्या वेळी दोन ते तीन हल्लेखोरांनी रस्त्यात त्यांचे वाहन अडविले.

दातीर यांना वाहनातून बाहेर काढून मारहाण

हल्लेखोरांनी लाकडी दांड्याने वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर दातीर यांना वाहनातून बाहेर काढून मारहाण केली. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने थांबविल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दातीर हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण आणि प्रशासकीय कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. या पार्श्वभूमीवर हल्ल्यामागील कारणाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांचा शोध घेऊन घटनेचा उलगडा करण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आर्थिक वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला

मनसेचे जिल्हा सरचिटणीस संतोष राजेंद्र पिल्ले यांच्यावर आर्थिक वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता सिन्नर फाटा परिसरात घडली. पिल्ले घरी जात असताना स्वागत लॉन्सजवळ संशयितांनी त्यांना अडवले. दहा लाख रुपये न दिल्याच्या कारणावरून वाद घालत बाळा जाधव याने कोयत्याने त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिल्ले यांनी प्रसंगावधान राखत वार परतवून लावल्याने ते बचावले. यावेळी संशयितांनी आरडाओरड करून ‘आम्ही तुला जिवंत सोडत नाही’, असे म्हणत मारहाण केली. या गुन्ह्याचा तपास हवालदार मोरे करीत आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत बाळा जाधव, सूरज शेजवळ, वैभव शेरकर, दिनेश जाधव, भूषण बच्छावाल व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा