Headlines

NASA Roman Telescope Launch: अंतराळातील गूढ उलगडणार! नासाच्या ‘रोमन स्पेस टेलिस्कोप’चे यशस्वी प्रक्षेपण, ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचाही घेणार शोध


वृत्तसंस्था, केप कॅनव्हेरल : अंतराळातील गूढ रहस्ये उलगडण्यासाठी आणि इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी ‘नासा’ची नवी आणि अत्याधुनिक ‘रोमन स्पेस टेलिस्कोप’ अंतराळात यशस्वीरीत्या झेपावली आहे.

सुमारे ४.३ अब्ज डॉलर खर्चून तयार करण्यात आलेली ही दुर्बीण ‘स्पेस-एक्स’च्या शक्तिशाली ‘फाल्कन हेवी’ रॉकेटद्वारे केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित करण्यात आली. ही दुर्बीण पृथ्वीपासून सुमारे १६ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘वेब स्पेस टेलिस्कोप’जवळ स्थापित केली जाईल. तेथे पोहोचण्यासाठी तिला तीन महिन्यांचा कालावधी लागेल.

Maharashtra TimesNepal Flood: मास्तरांना कडक सॅल्यूट! महापुरासारखा काळ समोर असताना १६४३ विद्यार्थ्यांना वाचवलं, पण शेवटी आक्रित घडलं‘नासा’च्या पहिल्या मुख्य खगोलशास्त्रज्ञ स्वर्गीय नॅन्सी ग्रेसी रोमन यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीला रोमन स्पेस टेलिस्कोप असे नाव देण्यात आले असून, ‘नासा’ने महिलेचे नाव दिलेली ही पहिलीच दुर्बीण आहे. ही दुर्बीण अंतराळाचा आतापर्यंतचा सर्वांत विस्तृत दृश्यपट (फिल्ड ऑफ व्ह्यू) टिपणार आहे. तिची क्षमता हबल दुर्बिणीपेक्षा १०० पटीने जास्त असून, कार्यवेग एक हजार पटीने अधिक आहे.

रोमन दुर्बीण हजारो सुपरनोव्हा, हजारो ग्रह आणि अब्जावधी आकाशगंगा शोधून काढेल; तसेच ब्रह्मांडाचा बहुतांश भाग व्यापणाऱ्या; परंतु अदृश्य असलेल्या ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’चा अभ्यास करून अंतराळाच्या विस्ताराचा वेग समजण्यास मदत करील. यात ताऱ्यांचा प्रकाश रोखणारे ‘कोरोनाग्राफ’ हे उपकरण असल्याने अंधुक ग्रहांची थेट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे.

Maharashtra TimesNepal Flood: नेपाळमध्ये प्रलयबळी 788वर; अडीच हजारांहून अधिक बेपत्ता, शोधपथकांची कसोटीअंतराळातील गूढ उलगडणार…

– विश्वाचा विस्तार, डार्क एनर्जी, डार्क मॅटर आणि दूरच्या आकाशगंगांचा अभ्यास करणे हा उद्देश

– हबल टेलिस्कोपइतकी तीक्ष्ण प्रतिमा देण्याची क्षमता, पण आकाशाचा खूप मोठा भाग एकाच वेळी पाहू शकते

– सौरमालेबाहेरील म्हणजेच एक्सोप्लॅनेट्स शोधण्यासाठीही ही दुर्बीण महत्त्वाची ठरणार

– नासाची ही पुढील पिढीतील अवकाश दुर्बीण असून, प्रक्षेपण या दशकात अपेक्षित

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत