Nanded Two Brothers Killed Younth Over a Petty Dispute; चोरीच्या पैशांवरुन वाद, दोन सख्ख्या भावांनी एका अल्पवयीन मुलाला संपवलं; पोलिसांना ‘त्या’ एका गोष्टीमुळे घटनेची खबर
Nanded Two Brothers Killed Younth Over a Petty Dispute; चोरीच्या पैशांवरुन वाद, दोन सख्ख्या भावांनी एका अल्पवयीन मुलाला संपवलं; पोलिसांना ‘त्या’ एका गोष्टीमुळे घटनेची खबर
Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
वादातून दोन भावांनी एकाची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : चोरी केलेल्या पैशांच्या वाटणीवरून दोन चोरट्यांमध्ये वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटनेत झालं आहे. दोन सख्या भावंडानीच क्षुल्लक करणावरुन एका 17 वर्षीय अल्पवयीन सहकाऱ्याची चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रविवारी 12 जुलै रात्री ही धक्कादायक घटना घडली. सागर सुभाष केळकर असं मयत तरुणाचं नाव आहे. मयत हा आरोपीसोबत बस स्थानकातील प्रवाशांचे पैसे चोरी करायचा. या खुनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
दोघे सख्ख्या भावांनी संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सागर केळकर (रा. जयभीम नगर) हा आरोपी अविनाश उर्फ बाटल्या इंगोले आणि त्याचा भाऊ शुभम इंगोले याच्यासोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल, पाकीट आणि पैसे चोरी करायचा. चोरीतील रक्कम आरोपी आणि मयत वाटून घ्यायचे. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच त्यांच्यात पैशांच्या वाटाघाटी वरून भांडण झालं. या वादातून आरोपींनी सागर केळकर यांच्यावर चाकूने पोटात, तोंडावर आणि डोक्यावर हल्ला केला. रक्तभंबाळ झालेल्या सागरचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे घटनेपूर्वी बसस्थानकामध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना आरोपी आणि मयत यांच्यात भांडण सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेतलं आहे. पैशांच्या वाटाघाटीवरून झालेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. Nagpur News : अरे नको, खाली उतर, वारंवार विणवण्या, पण तरुणाने ऐकलं नाही, अखेर हाय व्होल्टेज तारांच्या धक्क्याने आयुष्य संपलं
जिल्ह्यात दुसरी हत्येची घटना
दरम्यान, वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री खूनाची दुसरी घटना घडली. उसने दिलेले शंभर रुपये मागितल्यानं पंजाब राज्यातील रहिवासी असलेल्या एका युवकाने हरियाणा राज्यातील तरुणाचा खुन केला. मयत अमित वर्मा आणि आरोपी महावीरसिंग सुखदेव हे दोघे गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात राहत होते. अमित याने आरोपी महावीरसिंग सुखदेव याला शंभर रुपये उसने पैसे दिले होते. पैसे मागितल्याने महावीरसिंघ आणि अमित वर्मा यांच्यात रविवारी रात्री बंदाघाट परिसरात भांडण झालं. यात वादातून आरोपीने अमित वर्मा याच्यावर चाकूने वार खून केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. दरम्यान, एकाच रात्री खूनाच्या दोन घटना घडल्यानं जिल्ह्यात एकच प्रकारची खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा