Headlines

भारताला जिंकण्यासाठी 259 धावांचे टार्गेट, 80-5 नंतर इंग्लंडचे कमबॅक, शिवम दुबेची एक चूक पडली महागात, नेमकी काय?


IND vs ENG 1st ODI News : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात भारताने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडला रोखले होते. मात्र शिवम दुबेची एक चूक महागात पडली. ज्यामुळे इंग्लंडने ८०-५ वरून थेट २५८ धावा केल्या. त्यामुळे नेमकं काय चुकलं? जाणून घ्या.

IND vs ENG
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यामध्ये फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २५७ धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यात सुरूवातीला भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला बॅकफूटला ढकलले होते, मात्र इंग्लंडने कमबॅक करत एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. कारण ८०-५ वर असणाऱ्या इंग्लंडच्या संघाने २५० धावांचा टप्पा पार केला. यामागे शिवम दुबे याची एक चूक भारताला महागात पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेमकी काय चूक झाली जाणून घ्या.

इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी बुक याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सुरुवातीच्या १० ओव्हर मध्ये इंग्लंडने सावध सुरुवात केली होती. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा केला, इंग्लंडने पहिल्या दहा ओव्हरमध्ये एकही विकेट गमावली नाही. मात्र ११ ते २० ओव्हरमध्ये भारताने ५ विकेट घेत त्यांना पूर्णपणे बॅकफूटला ढकलले होते. पण मैदानात इंग्लंडच्या जो रूट याने तळ ठोकत संयमी खेळी केली. लियान डॉसन आणि रूट यांनी सातव्या विकेटसाठी १३४ चेंडू १२१ धावांची भागीदारी करत डाव सावरला.
Maharashtra TimesIND vs ENG Playing 11 : पहिल्या वनडेत भारताच्या त्रिमुर्तींचे कमबॅक, इंग्लंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी?

शिवम दुबेचं काय चुकलं?

शिवम दुबे याने रूटचा ७ धावांवर सोपा झेल सोडला होता. याचा फायदा रुटने घेतला आणि एकेरी आणि दुहेरी धावा सुरू ठेवत भागीदारी केली. जो रुट याला डॉसन यांनी चांगली साथ दिली. आपल्या फर्स्ट क्लास विकेटचा संपूर्ण अनुभव त्याने वापरला आणि संघासाठी मैदानावर उभा राहिला. डॉसन याने ८३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली, यामध्ये त्याने १ षटकार आणि ६ चौकार मारले. तर रूटने नाबाद ७६ धावा केल्या. दोघांच्या भागीदारीने इंग्लंडने २५० धावांचा टप्पा ओलांडला. परंतु दुबेने रूटचा झेल सोडला नसता तर कदाचित भारतानी इंग्लंडला आधीच रोखलं असतं. भारताकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक ४ विकेट तर प्रसिद्ध कृष्णा, गुरूनूर ब्रार यांनी दोन आणि बुमराहसह दुबेने एक-एक विकेट घेतली.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : एक द्विशतक, शेवटच्या वनडेमध्ये वादळी शतक तरीही प्लेइंग 11 मध्ये जागा नाहीच, मॅचविनर खेळाडू बाहेर; नेमका कोण?
दरम्यान, आता भारतीय संघाकडून शुभमन गिल, विराट कोहली रोहित शर्मा हे धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतात की इंग्लंड चे गोलंदाज त्यांना रोखणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा