Headlines

America – Iran Conflict | भांडण अमेरिका – इराणचे, बळी भारतीयांचे…आजवर इतके भारतीय प्राणास मुकले


शस्त्रसंधी असूनही मध्य आशियात इराण – अमेरिकेत चाललेल्या संघर्षात भारतीयांचा बळी जात आहे. नुकत्याच अमेरिकेने होर्मूझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर केलेल्या हल्ल्यात भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

नुकतेच इराणने पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत थेट आव्हान दिलं असताना प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत केलेल्या व्यापारी जहाजांवरच्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

इराणचा सामुद्रधुनीवरचा कब्जा…

यापूर्वीही अशाच हल्ल्यांमध्ये कित्येक भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्ध पेटले आहे. एकीकडे इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांना आपल्या निर्धारित मार्गांवरून जाण्यास भाग पाडण्यासाठी हल्ले करत आहे, तर दुसरीकडे अमेरिका तेहरानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : Nashik Women Molestation महिलेवर जमावाचा हल्ला, पाठलाग करत गाडीची तोडफोड, “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” घोषवाक्य हवेतच…

इराणचा निर्धार

चाललेल्या संघर्षात इराणने आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा निर्धार केला आहे. प्रत्युत्तर म्हणून, इराणने केवळ पश्चिम आशियातील अमेरिकेच्या तळांनाच लक्ष्य केले नाही, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजे आणि टँकर्सवरही हल्ले सुरूच ठेवले आहेत. 

अलीकडे झालेल्या हल्ल्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सोमवारी (१३ जुलै) संयुक्त अरब अमिरातीने सांगितले की, इराणने ओमानच्या सागरी हद्दीत त्यांच्या दोन टँकरना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. यात एक भारतीय खलाशी ठार झाला आणि इतर आठ जण जखमी झाले, त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. यापूर्वी रविवारी, इराणने सायप्रसचा ध्वज असलेल्या एका जहाजावर हल्ला केला होता. जहाजावरील ११ भारतीयांपैकी १० जणांना वाचवण्यात आले, तर एक जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत