Headlines

Nanded Police Abhishek Satpute Forces Hingoli Friend Navnath Lakhade to unnatural relation later ends life Crime News; मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचेत, नांदेडच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मित्राकडे अनैसर्गिक संबंधांचा तगादा, 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल


Nanded Police forces Friend : पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच मित्राकडे अनैसर्गिक संबंधासाठी तगादा सुरु केल्याने त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवलं

Nanded Police Assault Hingoli Man Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंगोली : नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच मित्राकडे अनैसर्गिक संबंधासाठी तगादा सुरु केला होता, त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथे हा प्रकार घडला. नवनाथ लाखाडे असं मयत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी नांदेडच्या पोलीस कर्मचारी अभिषेक सातपुते याच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दहा वर्षांपासूनची मैत्री

नवनाथ लाखाडे हा कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी होता. नांदेड पोलीस दलातील कार्यरत असलेल्या अभिषेक सातपुते याच्यासोबत त्याची मैत्री होती. सातपुते हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. दहा वर्षापासून दोघे चांगले मित्र होते.

Pune auo driver | सरकारच्या निर्णयाचं स्वागत तर भैय्यांची दादागिरी खपवून घेणार नाही

18 एप्रिल रोजी पोलीस कर्मचारी अभिषेक सातपुते हा वडगाव येथे आला. त्यानंतर दोघे जण आखाडा बाळापूर येथे आले. सायंकाळच्या सुमारास ते पुन्हा वडगाव शिवारात गेले. यावेळी अभिषेकने नवनाथ याच्याकडे अनैसर्गिक संबंध ठेवू दे, असा तगादा लावला. यापूर्वीही त्याने असा तगादा लावला होता, मात्र नवनाथने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आरोपीकडून सतत तगादा सुरु असल्याने या त्रासाला कंटाळून नवनाथने वडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली.
Maharashtra TimesDelhi Crime : अहो, तुमच्या मित्राने माझ्यावर बळजबरी केली; पीडित विवाहितेचा नवऱ्याला रडत फोन, राहुलच्या विकृतीचा पाढा वाचला

२२ तासांनंतर बॉडीची तपासणी

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत नवनाथ यांचं शव उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र जोपर्यंत अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बॉडीवर उत्तरीय तपासणी करू देणार नाही, अशी भूमिका नवनाथच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी घेतली होती.
Maharashtra TimesDombivli News : सायनला लोकलमध्ये चढले, डब्यातच बेशुद्ध, डोंबिवलीकर ज्येष्ठाकडे प्रवाशांसह रेल्वेचंही दुर्लक्ष, रात्रभर 15 तास ट्रेनमध्येच पडून
त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महिला व पुरुषांचा जमाव एकत्र आला होता. सायंकाळी उशिरा नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीवरून अभिषेक सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २२ तासांनंतर मृत नवनाथच्या पार्थिवावर उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा