Headlines

Nanded Abhay Belkone Missing One and a Half Months Found by Malad Police Father Thanks Police; पोलिसांच्या रुपात देव भेटला! बेपत्ता लेकराला पाहताच कुटुंब ढसाढसा रडलं, मेडिकलचा विद्यार्थी ‘अभय’ दीड महिन्यांपासून गायब; भिकारी म्हणून दिवस काढले


Mumbai Beggar turn out Nanded Medical Student Abhay : नांदेडमधील एक मेडिकलचा विद्यार्थी मुंबई पोलिसांना सापडला. त्याच्या आई-वडिलांसह कुटुंब दीड महिन्यापासून त्याचा शोध घेत होतं. मुलाला परत पाहिल्यानंतर कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

Mumbai Beggar turn out Nanded Medical Student Abhay
मुंबई भिकारी नांदेड मेडिकल विद्यार्थी अभय बेळकोने(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : ‘दीड महिन्यापूर्वी घरातून निघून गेलेला आमचा मुलगा पुन्हा सापडेल, यावर आमचा विश्वास नव्हता. शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे तो पुन्हा भेटेल याची आशाच सोडून दिली होती. पण, पोलिसांच्या रूपात आम्हाला देव भेटला’, अशा शब्दांत अभयचे वडील सुरेश बेळकोने यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली. दीड महिन्याच्या तीव्र विरहानंतर आपल्या पोटच्या गोळ्याला सुखरूप समोर पाहताच बोळकोने कुटुंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. खाकी वर्दीच्या मागे असलेल्या संवेदनशील मनामुळे आज नांदेडचे एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभय बेळकोने हा हदगांव तालुक्यातील तामसा येथील रहिवासी असून जळगाव येथे होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सुरेश बेळकोने हे वायफना येथील जिल्हा परिषद येथे शिक्षक पदी कार्यरत आहेत, तर एक भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे एमबीबीएस डॉक्टर आहे. अभय हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र मागील काही वर्षापासून तो डिप्रेशनमध्ये गेल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. दीड महिन्यापूर्वी तो कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला. वडील नेहमीप्रमाणे शेताकडे गेले होते.
Maharashtra TimesMumbai News : मुंबईतील भिकारी निघाला मेडिकलचा विद्यार्थी, मालाड पोलिसांनी नांदेडचा ठावठिकाणा शोधला, ‘अभय’ला पाहताच कुटुंब गदगदलं
रात्रभर तो घरी न परतल्यानं कुटुंब चिंतेत होतं. नातेवाईकांकडे विचारपूस केली. संपूर्ण शहरात शोध देखील घेतला, मात्र त्याचा शोध काही लागला नाही. शेवटी तामसा पोलीस ठाण्यात कुटुंबियानी हरवल्याती तक्रार दाखल केली. सलग दीड महिना कुटुंबाने अभयचा शोध घेतला. मात्र, कोणताही सुगावा न लागल्यानं त्यांनी शेवटी आशा सोडून दिली. फोन देखील बंद येत असल्यानं कुटुंबाची चिंता वाढत गेली आणि आपला मुलगा पुन्हा भेटेल याची आशा त्यांनी सोडून दिली होती. अखेर गुरुवारी 21 मे रोजी मुंबईच्या मालाड पोलिसांचा एक फोन आला आणि दुरावलेला मुलगा कुटुंबाला पुन्हा भेटला. दरम्यान, मुलाला पाहताच कुटुंबातील सदस्यांचा कंठ दाटून आला अन् अश्रू अनावर झाले होते. ‘पोलिसांच्या रुपात आम्हाला देव भेटला’, असं म्हणत बेळकोने यांनी पोलिसांचे आभार मानले.

मुंबई पोलिसांनी दाखवली माणुसकी

भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. याच मोहिमेअंतर्गत मालाड पोलिसांच्या एका पथकाला भिकारी अवस्थेत तरुण आढळून आला. दाढी वाढलेली आणि त्याच्या अंगावर मळकट कपडे होते. पोलिसांनी कुटुंबाबाबत विचारणा केली, सुरुवातीला त्याला बोलता आलं नाही. अनेकवेळा विचारणा केल्यानंतर तेव्हा त्याने नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तामसा पोलिसांशी संपर्क करून कुटुंबाची माहिती घेतली, त्यानंतर अभयच्या वडिलांना फोन करून सदरची माहिती दिली. दरम्यान, यावेळी कोमलसिंग जाधव या पोलीस कर्मचाऱ्याची माणुसकी पाहायला मिळाली. जाधव यांनी तरुणाला आंघोळ घातली नवीन कपडे घातले. शिवाय जेवण देखील दिले.
Maharashtra TimesEl Nino: शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट; कृषी विभागाचा ‘वॉर प्लान’ तयार

तिरुपती ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेनं प्रवास

डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारा अभय हा मानसिक रुग्ण होता. दीड महिन्यापूर्वी राहत्या घरून बेपत्ता झाला होता. सुरुवातीला तो नांदेडहून इंदौरला गेला. या प्रवासादरम्यान त्याच्याजवळ असलेली छोटी बॅग आणि मोबाईल चोरीला गेला. प्रवासादरम्यान त्याला काहीच सुचलं नाही. तिरुपती ते कन्याकुमारीपर्यंत त्याने रेल्वेने प्रवास केल्याचं त्याने कुटुंबाला सांगितलं. दरम्यान, खिशात पैसे नसल्यानं त्याला दीड महिने भीक मागण्याची वेळ आली. घरी जायचं होतं, पण काहीच सुधरत नसल्याने अभय भीक मागून दिवस काढत होता. तब्बल दीड महिन्यानंतर पोटच्या लेकराला पुन्हा पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंब अक्षरश: गदगदलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा