Headlines

Nana Patole: महाजेनकोत 10 हजार कोटींचा घोटाळा? नाना पटोलेंचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी – nana patole serious allegation rs 10000 crore scam at mahagenco demands high-level inquiry


Nana Patole On MahaGenco: पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी महाजेनकोतील कोळशाची गुणवत्ता आणि कंत्राट प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Anderson Phillip Catch - 2026-08-27T063507
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अर्थात महाजेनकोमध्ये गेल्या पाच वर्षांत सुमारे १० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील वीजदर वाढण्यामागील अनेक कारणांपैकी भ्रष्टाचार हेही एक कारण असल्याचा दावा त्यांनी केला.

कच्चा कोळसा वॉशरीमध्ये पाठविला जात असतानाही त्यामध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. काही कंपन्यांकडून पुरवठा होणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार सर्वसामान्यांकडून अधिक पैसे घेऊन राज्याची लूट करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी असल्याने त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Maharashtra TimesTukaram Mundhe : वैध परवाना नाही, स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा, मेडिकल कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना जेवण; तुकाराम मुंढेंची धडक कारवाईस्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून, ठरावीक व्यक्तींना कंत्राटे देण्यासाठी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काळ्या यादीत टाकलेल्या व्यक्ती किंवा कंपन्यांनाही कंत्राटे देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

कायदा-सुव्यवस्थेवर टीका

नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत पटोले यांनी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या तीन महिन्यांत शहरात ३६ गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली.

Babanrao Taywade | ओबीसी नेत्यांची हक्कासाठी लढाई की नेतृत्वासाठी स्पर्धा?, तायवाडेंचं म्हणणं काय?

राहुल गांधींचा पुढील महिन्यात नागपूर दौरा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुढील महिन्यात नागपूर दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, अशी माहिती पटोले यांनी दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पटोले यांनी सरकारवर टीका केली. सरकार आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेत असून, त्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग देऊन विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा