Headlines

Nagpur Students die on way to Friend Birthday Party in Car Accident Driver Father likely to book Crime News; मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यात


म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून आदळल्याने हा अपघात झाला. ही घटना बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूरमधील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव ते भरतवाडा वाय पॉइंट मार्गावर घडली.

भौमिक अमोल लारोकर (वय १६, रा. वर्धा रोड) आणि सागर संजय मेलवानी (वय १७, रा. पारडी) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मिहीर आनंद बेहार (वय १७, रा. सुभाननगर) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघेही अकरावीत शिकत होते.

जयला सर्वात आधी विश करण्याचा प्लॅन

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जय नावाच्या मित्राचा बुधवारी वाढदिवस होता. त्याला सर्वांत आधी शुभेच्छा देऊन पार्टी करण्याची योजना या तिघांनी आखली होती. ठरल्याप्रमाणे सागर आणि भौमिक भरतवाडा परिसरातआले. काही वेळाने मिहीर हा त्याच्या वडिलांची एमएच-४९- सीएस- ०४२७ क्रमांकाची कार घेऊन तेथे पोहोचला. त्यांनी जयशी संपर्क साधून त्याला भरतवाडा येथे बोलाविले. मात्र, ‘मला यायला थोडा वेळ लागेल’, असे जयने सांगितले.

Maharashtra TimesGhatkopar Landslide : वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंत

स्पीड वाढवला अन् नियंत्रण सुटलं

जय येईपर्यंत कारने फिरून येऊ, असे मिहीरने सांगितले. त्यानंतर भौमिक आणि सागर कारमध्ये बसले. कार मिहीर चालवत होता. काही वेळातच कारचा वेग वाढला. वळणावर मिहीरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार समोर उभ्या असलेल्या सीजी-०४- एमसी- २९८१ क्रमांकाच्या ट्रकवर मागाहून आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील अर्धा भाग चक्काचूर झाला.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून भौमिक आणि सागर यांना मृत घोषित केले. मिहीरची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिहीरच्या वडिलांवर गुन्हा नोंदवण्याचे संकेत

अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्यामुळे मिहीरच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास कळमना पोलिस करीत आहेत.

Maharashtra TimesKiran Indulkar : 50 ग्रॅम पावडरच्या धमकीनंतर पोलीस दलाला पुन्हा काळिमा; सापळा रचला अन् पोलीसच रंगेहाथ सापडला, कॉन्स्टेबल इंदुलकरला अटक

कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

दुसरीकडे, हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहिरगाव परिसरात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. डोमाजी हरिभाऊ तुरक (रा. मोहाडी, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. एमएच- ४०- बीजे- ५१०६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने एमएच- ४०- एएस- ८५१३ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील बाइकरचा छत्तीसगडमध्ये अंत

दरम्यान, छत्तीसगडमधील बस्तर विभागात गेलेल्या मोटारबाइकर्सच्या गटातील रिद्धी ठक्कर या तरुणीचा बुधवारी सकाळी बालोद जिल्ह्यात अपघातात करूण अंत झाला. तिच्या दुचाकीला अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra TimesBaramati Crime : लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोप
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वरील मरकाटोला घाटात सकाळी ६ वाजता हा अपघात झाला. त्यात रिद्धी ठक्कर या तरुणीचा मृत्यू झाला असून, ती मुंबईतील बोरिवलीत राहत होती, असे समजते. महाराष्ट्रातील विविध भागांतील आणि काही इतर राज्यांतील सुमारे २० मोटारबाइकर्सचा गट यापूर्वी रायपूर येथे पोहोचला होता. तेथून तो बस्तर विभागाकडे जात असताना हा अपघात झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ठक्कर बजाज अव्हेंजर चालवत असताना तिच्या मोटारसायकलला अज्ञात अवजड वाहनाने धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत