Nagpur shocking revelation of assault by guard in an ashram school 44 year old rajesh arrested; आश्रमशाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यांवर अत्याचार, जबाबात धक्कादायक माहिती उघड, ४४ वर्षीय राजेशला अटक
Nagpur shocking revelation of assault by guard in an ashram school 44 year old rajesh arrested; आश्रमशाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यांवर अत्याचार, जबाबात धक्कादायक माहिती उघड, ४४ वर्षीय राजेशला अटक
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आश्रमशाळेत सेवक म्हणून कार्यरत असलेल्या ४४ वर्षीय राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरोधात कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा, तसेच एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्टच्या रात्री आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक शोषणाची घटना घडल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर दुसऱ्या एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात समोर आले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी याबाबत आश्रमशाळेच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षकांनी तातडीने कोंढाळी पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती रात्री उशिरा बाल संरक्षण विभागाच्या हेल्पलाइनवर मिळाली. त्यानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाचे पथक कोंढाळी पोलिसांसह आश्रमशाळेत दाखल झाले. पथकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्राथमिक माहिती घेतली. चौकशीदरम्यान एका अल्पवयीन विद्यार्थिनीनेही तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याची माहिती दिल्याचे बाल संरक्षण विभागाचे अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची व्याप्ती आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाच्या पथकाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेत निवासी असलेल्या सर्व २६० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. तसेच आश्रमशाळेतील वातावरण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था आणि अन्य कोणते गैरप्रकार घडले आहेत का, याचीही तपासणी केली जात आहे. निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेवरही आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा