Headlines

Parents Throw Son out of Property; पालकांच्या संपत्तीवर मुला-मुलींचा जन्मसिद्ध अधिकार नाही, ते बेदखल करू शकतात! काळजी घेतली नाही तर परत घेण्याचा अधिकार

Parents Evict Children from Property: मुंबईत पालकाने आपल्या मुलाला आपली काळजी घेण्याच्या अटीवर दोन फ्लॅट्स भेट दिले होते, पण तसे न झाल्यामुळे त्यांना न्यायालयाची मदत घेणे भाग पडले. न्यायालयाने आता मुलाला फ्लॅट रिकामा करण्याचे आदेश दिले असून अशा परिस्थितीत, कायदा काय सांगतो प्रत्येक मुलगा आणि मुलीला माहिती असले पाहिजे.

Parents Evict Son Property Rules India
वृद्ध पालक आपल्या मुलाला दिलेले घर परत घेऊ शकतात का?
Property Dispute: पालक आपल्या पोटाच्या मुलगा किंवा मुलीवर डोळेझाकुन विश्वास ठेवतात. म्हातारपणी आपली मुलं-मुली आपला आधार बनली या अपेक्षेने हसतमुखाने आपल्या आयुष्यभराची बचत घर मुलांच्या नावे करतात. पण दुर्दैवाने घराचा वारसा मिळताच मुलाचा खरा रंग दिसू लागतो आणि जे एकेकाळी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतल्याचा अभिमान बाळगायचे तेच, नंतर पालकांना ओझे मानू लागतात किंवा त्यांना घरातून हाकलून देण्याचा प्रयत्नही करतात.

यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, अशा परिस्थितीत पालकांचे कायदेशीर हक्क काय आहेत? जे त्यांना आपल्या मुलांविरुद्ध कारवाई करण्यास किंवा स्वतःच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा हक्क देतील.

बॉम्बे उच्च न्यायालयाचा पालकांना दिलासा

बॉम्बे उच्च न्यायालयाचा पालकांना दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच आपल्या एका निकालात मुलाला आई-वडिलांनी दिलेल्या दोन मालमत्ता खाली करण्याचे आदेश दिले आहेत. आपला मुलगा आपली काळजी घेईल या उद्देशाने पालकांनी दोन फ्लॅट्स मुलाला भेट म्हणून दिले होते. त्यामुळे भारतीय कुटुंबांसमोर प्रश्न उपस्थित होतो की, जर मुलं आपली वृद्ध आई-वडिलांची काळजी घेऊ शकत नसतील तर, पालक मुलांना मालमत्ता किंवा संपत्तीतून बेदखल करू शकतात का?

पालक मुलांना मालमत्ता किंवा संपत्तीतून बेदखल करू शकतात का?

पालक मुलांना मालमत्ता किंवा संपत्तीतून बेदखल करू शकतात का?

या प्रश्नाचे उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण अनेक लोक आपल्या वृद्ध आई-वडिलांना त्यांची गरज पूर्ण झाल्यावर वाऱ्यावर सोडून देतात. पण या प्रश्नच उत्तर हो किंवा नाही, असं देता येणार नाही. भारतीय कायद्याने ज्येष्ठ नागरिकांना अशा परिस्थितीत संरक्षण दिले आहे, पण ज्येष्ठ नागरिक कायदा, 2007 मध्ये नमूद केलेले नियम आणि कार्यपद्धतींचे पालन केले गेले पाहिजे.

मुंबई उच्च न्यायालयातील खटला कशाबद्दल

मुंबई उच्च न्यायालयातील खटला कशाबद्दल

2023 मध्ये 68 वर्षीय रमेश बचोलालाल सोनी यांनी आपल्या मुलाला दोन फ्लॅट्स—एक लोअर परळ आणि एक भायखळा येथे – भेट म्हणून दिलेले. दोन्ही गिफ्ट डीडमध्ये मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याचे स्पष्ट नमूद केलेले. पण, नंतर परिस्थिती इतकी बिघडली की आई-वडिलांना आपले घर सोडावे लागले. भायखळा येथील घराचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या घराच्या समस्या आणखी वाढल्या.

मुलाने आईवडिलांची काळजी न घेणे

मुलाने आईवडिलांची काळजी न घेणे

त्यानंतर आई-वडिलांनी ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. न्यायाधिकरणाने लोअर परळ येथील फ्लॅटचे गिफ्ट डीड रद्द करून मुलाला 60 दिवसांत फ्लॅट खाली करण्याचे आदेश दिले, ज्याला मुलाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 23 अंतर्गत न्यायालयाने मुलाच्या विरोधात जाऊन गिफ्ट डीडमध्ये मुलाने काळजी घेण्याची अट स्पष्ट नमूद केल्याचे मान्य केले.
अशा परिस्थितीत, मुलाने आईवडिलांची काळजी न घेणे या अटीचे उल्लंघन मानले. मात्र, मुलाने फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे दिल्याचा दावा केला पण, आपल्या दाव्याला साजेशा पुरावा सादर करू शकला नाही. नंतर मुलाने आपल्या आईवडिलांना लोअर परळ येथील फ्लॅटमध्ये राहू देण्याचा प्रस्ताव ठेवला, पण न्यायालयाने प्रस्ताव उशिरा दिला गेला आहे असे मानून मुलाची याचिका फेटाळून लावली.

पालक मुलांना घरातून बाहेर काढू शकतात का?

पालक मुलांना घरातून बाहेर काढू शकतात का?

होय, काही प्रकरणांमध्ये पालकांना अधिकार आहे. पण पालक आपल्या मुलांना त्यांच्या मालमत्तेतून कधीही बाहेर काढू शकत नाही आणि मुलांना पालकांच्या मालमत्तेत राहण्याचा हक्क आपोआप मिळत नाही. वृद्धांकडे दुर्लक्ष किंवा छळापासून संरक्षण देण्याची कायद्यात तरतूद केलेली आहे, पण घरातून बाहेर काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये वृद्धांच्या सुरक्षितता आणि देखभालीच्या हक्कांचा विचार करून न्यायालय घरातून बाहेर काढण्याचा आदेश देऊ शकते.

ज्येष्ठ नागरिक कायदा काय सांगतो

ज्येष्ठ नागरिक कायदा काय सांगतो

वयोवृद्धांना आर्थिक सहाय्य आणि संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक कायदा, 2007 केला गेला आहे. उत्पन्न किंवा मालमत्तेवर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असल्यास तर पालक पात्र असल्यास त्यांच्या मुलांकडून किंवा काही विशिष्ट नातेवाईकांकडून काळजी घेण्याची मागणी करू शकतात. त्यामुळे वयोवृद्ध पालकांशी संबंधित मालमत्तेचे वाद सामान्य मालमत्तेच्या प्रकरणांपेक्षा वेगळे असू शकतात.

ज्येष्ठ नागरिक दिलेली मालमत्ता परत मालमत्ता परत मागू शकतात का?

ज्येष्ठ नागरिक दिलेली मालमत्ता परत मालमत्ता परत मागू शकतात का?

हो, काही प्रकरणांमध्ये शक्य आहे. ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 23 नुसार एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने आपली मालमत्ता दुसऱ्याला आपल्या काळजी घेण्याच्या अटीवर दिली असेल आणि नंतर ती व्यक्ती तसे करण्यास अयशस्वी ठरल्यास मालमत्तेचे हस्तांतरण रद्द करण्याची मागणी करू शकतात. लक्षात घ्या की कलम 23 प्रत्येक मालमत्ता विवादाला लागू होत नाही. मालमत्ता देण्याची पद्धत, घातलेल्या अटी आणि ज्येष्ठांच्या दुर्लक्षाचा पुरावा, या सर्वांचा विचार केला जातो.

मालमत्ता केवळ पालकांच्या नावे असली तर?

मालमत्ता केवळ पालकांच्या नावे असली तर?

पालकांनी स्वतःच्या कमाईतून घर किंवा फ्लॅट खरेदी केलेली असेल, तर केवळ कुटुंबातील सदस्य म्हणून मुलगा किंवा मुलीचा त्या मालमत्तेवर थेट हक्क नसतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालमत्तेत राहण्याचा आणि योग्य वापर करण्याचा हक्क आहे पण, ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत प्रत्येक मालमत्तेचा वाद त्वरित सोडवला जाऊ शकत नाही. वादामध्ये मालकी, वारसा हक्क किंवा मालमत्तेच्या विभागणीचा समावेश असल्यास दिवाणी न्यायालयात खटले दाखल केले जाऊ शकतात.

वृद्ध व्यक्तींची काळजी घेतली जात नसेल तर काय करावे?

वृद्ध व्यक्तींची काळजी घेतली जात नसेल तर काय करावे?

वृद्ध पालकांनी सर्वप्रथम छळाचे पुरावे – जसे की मालमत्तेची कागदपत्रे, वैद्यकीय बिले, बँकेची कागदपत्रे, मुलांशी झालेले संभाषण आणि मालमत्ता हस्तांतरणाची कागदपत्रे- जपून ठेवावे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून मदत मागू शकतात आणि प्रकरण मालमत्ता, वारसा हक्क किंवा विभागणीशी संबंधित असल्यास पात्र वकिलाचा सल्ला घेतला पाहिजे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा