Nagpur Pollution: रस्त्यावरील धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि औष्णिक वीज प्रकल्प हे धूलिकणांचे प्रमुख स्रोत असल्याचे सीआरईएच्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीआधारे हे विश्लेषण करण्यात आले. मार्च ते मे या ९२ दिवसांच्या कालावधीत नागपूरमध्ये ४६ दिवस पीएम-१० म्हणजे धूलिकणांची पातळी वार्षिक सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त नोंदली गेली. ही सुरक्षित मर्यादा ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आहे. याच कालावधीत मुंबई आणि पुण्यात सुरक्षित मर्यादा ओलांडणारे दिवस केवळ पाच ते सहा होते. त्यामुळे उन्हाळ्यातील वायूप्रदूषणाच्या बाबतीत नागपूरची स्थिती अधिक चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? भाजपमधील मित्रांकडून मला माहिती; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोटमे महिन्यात नागपूर हे राज्यातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले, तर एप्रिलमध्ये शहराचा क्रमांक पाचवा होता. मेमध्ये नागपूरमधील धुलीकणांची सरासरी पातळी सुमारे १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदली गेली. याबाबत मे महिना हा शहरातील गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक दुसरा प्रदूषित महिना ठरला. जीपीओ, सिव्हिल लाइन्स आणि महाल येथील निरीक्षण केंद्रांवर उन्हाळ्यातील तिन्ही महिन्यांत धूलिकणांची पातळी सातत्याने सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक होती.
पावसाचा अभाव असल्याने रस्त्यावरील धूळ वाहनांच्या हालचालींमुळे पुन्हा हवेत मिसळते. तसेच नागपूर हे अंतर्गत शहर असल्याने हवेची देवाणघेवाण तुलनेने कमी होते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सीआरईएचे विश्लेषक डॉ. मनोज कुमार यांनी उन्हाळ्यातील प्रदूषणाकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.
Crime News: तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला!प्रमुख कारणे
-रस्त्यावरील धूळ
-औद्योगिक उत्सर्जन
-औष्णिक वीज प्रकल्प
-पावसाचा अभाव
-अंतर्गत शहर असल्याने हवेची देवाणघेवाण कमी
उन्हाळ्यातील धूलिकणांची स्थिती
शहर सुरक्षित— मर्यादा ओलांडलेले दिवस
नागपूर— ४६
मुंबई— ५ ते ६
पुणे— ५ ते ६

