Headlines

सगुण-निर्गुण: भक्ति तो कठिण… – anirudh shandilya sagun nirgun special article on bhakti


-अनिरुद्ध शांडिल्य

उंच, अधिक उंच. वेग, अधिक वेग, अशी आस माणसाला आहे. आपण अधिकाधिक मोठं व्हावं, साऱ्यांनी आपलं कौतुक करावं, आपली वाहवा करावी, आपल्या भोवती आरत्या ओवाळाव्यात, आपली तारीफ करावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. हे मोठेपण मिळवायचं, तर त्यासाठी कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, चिकाटीनं आणि न दमता सतत काम करावं लागतं, कल्पनाशक्ती सतेज ठेवावी लागते आणि हे सारं साधायचं तर मनाची एकाग्रता असावी लागते, पण उंच जाण्याच्या वेडाबरोबरच आपल्याला सगळंच काही पटकन व्हावं असंही वाटत असतं. याचं कारण आपल्याला वेगाचंही पिसं लागलेलं आहे,आाणि ते वाढतच चाललेलं आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे.

बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात।।’ ते या क्षणी इथं आहे, तर दुसऱ्या क्षणी कुठं जाईल याचा नेम नाही. याचं कारण माणसाचं मन मोकाट, ओढाळ, चपळ, लहरी आहे आणि जहरीही आहे. या मनाला आवर घालणं म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यासारखं आहे. आणि त्या आदिशक्तीला ज्या सगुण रूपात आपण बघत असतो, त्याची भक्ती करायची तर मनाची एकाग्रता साधावी लागते. चित्त आवरावं लागतं. मोह दूर सारावे लागतात. तरच ईश्वराची भक्ती करणं शक्य होतं.

थोडक्यात, देवाची भक्ती करणं ही सोपी गोष्ट नाही. गंध-माळा-टिळे, आरत्या हे बााह्योपचार झाले. पूजा करणं हा देखावा झाला. पण मनाला त्या सगुणाशिवाय साऱ्या जगाचा विसर पडत नाही, सारं चित्त त्या मूर्तीवर केंद्रित होत नाही, अवघी नजर त्या चरणांवर खिळत नाही, तोवर सारं व्यर्थ आहे. तुकाराम महाराज सांगतात,

‘भक्ति तो कठिण शुळावरील पोळी।

निवडे तो बळी विरळा शूर।।

जेथें पाहें तेथों देखीचा पर्वत।

पायाविण भिंत तांतडीची।।

कामाविले तरि पाका ओज घडे।

रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे।।

तुका म्हणे मना पाहिजे अंकुश।

नित्य नवा दिस जागृतीचा।।’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत