Nagpur Legislative Council Election Results : नागपूर विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झाला आहे.

…तो एक चर्चेचा विषय
मात्र, या निवडणुकीचा सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये झालेली मोठी फूट. काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे सुमारे 200 हून अधिक हक्काची मते असताना अतुल लोंढे यांना केवळ 130 मते मिळाल्याने आघाडीतील मतदारांनीच साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत एकूण 836 मतदारांपैकी 823 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी 98.44 इतकी नोंदविण्यात आली. मतमोजणीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना तब्बल 682 मते मिळाली, तर काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ 130 मतांवर समाधान मानावे लागले. 11 मते अवैध ठरली.
Dharashiv Basavaraj Patil : विधान परिषदेत भाजपचाच बोलबाला; बसवराज पाटलांची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले पहिले उमेदवार
निवडणुकीच्या आकडेवारीवरून महाविकास आघाडीतील मोठ्या प्रमाणावरील मतफुटी समोर आली आहे. काँग्रेसकडे सुमारे 200 मते असतानाही उमेदवाराला फक्त 130 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची सुमारे 70 मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता तब्बल 99 मते विरोधी गटाकडे गेल्याचं चित्र दिसून आलं आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पराभवापुरती मर्यादित न राहता काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
‘हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा पराभव’
या विजयानंतर भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी डॉ. पोतदार यांना खांद्यावर उचलून त्यांची मिरवणूक काढली. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. राजीव पोतदार यांनी ‘हा निकाल महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरील अविश्वासाचा कौल असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडीचा पराभव निश्चित होता, मात्र इतका दारुण पराभव होईल याची अपेक्षा नव्हती. काँग्रेसकडे दोनशेहून अधिक मते असताना त्यांना केवळ 130 मते मिळाली. स्वतःची मतेही काँग्रेसला राखता आली नाहीत. हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा पराभव आहे’, असं त्यांनी सांगितलं.
Krishna Patil Ashtikar : फुटीर खासदार आष्टीकरांच्या मुलाची ठाकरेसेनेतून हकालपट्टी, राऊतांची घोषणा, निकालानंतर काही मिनिटांतच कारवाई
पोतदार यांनी पुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत, ‘हा निकाल काँग्रेसच्या नेतृत्वाचा पराभव आहे’, असं पोतदार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींनी महायुतीवर विश्वास दाखविल्यामुळेच हा विक्रमी विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
अतुल लोंढे काय म्हणाले?
‘मी पराभूत झालो नाही, तर हा माझा नैतिक विजय आहे. फुटलेल्या मतदारांसंदर्भात कोणतीही तक्रार नाहीय. भाजपने 10-10 लाख रुपये देऊन काँग्रेस आणि मविआचे मतदार फोडले’, असं म्हणत अतुल लोंढे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
Bhaskar Jadhav : मिलिंद नार्वेकर एवढे हळवे आहेत माहिती नव्हतं, भास्कर जाधवांची सारवासारव, राहुल नार्वेकर समजून विधान केल्याचा दावा
शहराध्यक्ष विकास ठाकरे काय म्हणाले?
‘मतं फुटायला नको होती, झालं ते चांगलं झालं नाही. प्रदेश काँग्रेसने जबाबदारी दिली त्यांनी मतफुटीवर बोलावं. ज्यांनी उमेदवार ठरवले त्यांना जबाबदार धरणार का? मते फुटली त्याबाबत मी प्रदेशाध्यक्षांशी बोलणार आहे. ज्यांची मते फुटली त्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी करणार आहे’, असं नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे.

