Nagpur Khushi Mundhada dies in Accident near Sangli Hospital last rites at Ambazari Ghat Crime News; मुंबईत मेडिकल शिक्षण, उदयोन्मुख डॉक्टर तरुणी खुशी मुंधडा मृत्यू, रुग्णसेवेनंतर मध्यरात्री घरी जाताना काळाचा घाला
Nagpur Khushi Mundhada dies in Accident near Sangli Hospital last rites at Ambazari Ghat Crime News; मुंबईत मेडिकल शिक्षण, उदयोन्मुख डॉक्टर तरुणी खुशी मुंधडा मृत्यू, रुग्णसेवेनंतर मध्यरात्री घरी जाताना काळाचा घाला
Nagpur Doctor Khushi Mundhada Death : बुधवारी रात्री अडीच वाजता नेहमीप्रमाणे निवासी सेवा देऊन डॉ खुशी मुंधडा हॉस्पिटलमधून मोपेडने घरी जात असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपुरातील महिला डॉक्टरचा सांगलीत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. खुशी पवन मुंधडा (वय २५, रा. दिग्विजय अपार्टमेंट, शिवाजीनगर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
कुटुंबातील मोठी मुलगी
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातल्या शिवाजी नगर भागात माहेश्वरी समाजातील मुंधडा कुटुंब राहतं. पवन मुंधडा यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, तर त्यांची पत्नी मानसोपचार समुपदेशक. त्यांना खुशी, पार्थ आणि पूर्वा अशी तीन मुलं. त्यापैकी सर्वांत मोठ्या खुशी यांनी २०२४ मध्ये मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
शल्यक्रिया विभागात पदव्युत्तर एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवत दुसऱ्याच वर्षी त्यांनी सांगलीतल्या भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
हॉस्पिटलमधून घरी जाताना अपघात
बुधवारी रात्री अडीच वाजता नेहमीप्रमाणे निवासी सेवा देऊन खुशी या हॉस्पिटलमधून मोपेडने घरी जात होत्या. त्यावेळी कारने त्यांच्या मोपेडला धडक दिली. सोबत दुसऱ्या दुचाकीने प्रवास करणाऱ्या निवासी डॉक्टरने खुशी यांना रुग्णालयात नेले, मात्र कारच्या चाकाखाली चिरडून गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले.
दुसरीकडे, रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारचे दार मागून येणाऱ्या वाहनांची खात्री न करता अचानक उघडले. यामुळे झालेल्या अपघातात फूड डिलिव्हरी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील हडपसर येथील डी. पी. रस्त्यावर घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलंमार्फत फकीर अली (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ अब्दुल सलाम फकीर अली यांनी तक्रार दिली आहे. १७ जुलै रोजी दुपारी हा अपघात झाला. तेव्हापासून मार्फत अली रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्फत फूड डिलिव्हरीसाठी जात असताना रस्त्याकडेच्या कारमधील चालक रज्जाक लालासाहेब नदाफ (३०) याने मागून येणाऱ्या वाहनांची खात्री न करता कारचे दार अचानक उघडले. त्यामुळे मार्फतची दुचाकी दाराला जोरात धडकली आणि तो रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा