Headlines

Mumbai Local Train Woman Passenger Beaten up in Genral Coach; लोकल ट्रेनमध्ये सीटवर झोपल्याचा राग, बेल्ट काढून धमकावलं, महिला प्रवाशाला मारहाण; इतरांची बघ्याची भूमिका


Mumbai Local Train Woman Passenger Beaten : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. आता एका पुरुष प्रवाशाने महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Mumbai Local Train
मुंबई लोकल महिला प्रवाशाला मारहाण व्हिडिओ
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये भांडण होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत, यात काहीवेळा धक्कादायक प्रकार देखील घडलेले आहेत. यामुळे लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. ही सगळी चर्चा सुरु असतानाच आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. ट्रेनमध्ये पुरुषांच्या डब्यात पुरुष प्रवाशाने एका महिलेला मारहाण केली. हा सगळा प्रकार सुरु असताना आजूबाजूला बसलेले प्रवासी थंडपणे हा प्रकार बघत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यातील आहे. ही महिला ट्रेनच्या डब्यातील सीटवर झोपली होती. त्यावरुन वाद झाल्यानंतर या पुरुष प्रवाशाने तिला मारहाण केली. तो तिला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळही करत आहे. संबंधित पुरुष प्रवाशाने कमरेचा पट्टा काढून मारण्याचा धाक महिलेला दाखवला. हा सर्व प्रकार सुरु असताना आजुबाजूला अनेक पुरुष प्रवासी बसलेले होते. मात्र, यापैकी एकानेही या पुरुषाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रकार नक्की कोणत्या लोकल ट्रेनमध्ये घडला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून संबंधित पुरुष प्रवाशाला पकडून त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesMissing Link Accident Video : भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा अपघात; पुण्याच्या तुषार भुमकरचा मृत्यू

तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेची लोकल सेवा गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दोन तांत्रिक बिघाडांमुळे विस्कळीत झाली. दिवा स्थानकात एसी लोकलमध्ये बिघाड झाल्यानंतर काही वेळातच ठाणे स्थानकात साध्या लोकलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. या दुहेरी फटक्यामुळे अप धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. मध्य रेल्वेच्या जवळपास १५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक फेऱ्या सुमारे तासभर विलंबाने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News:महिला नवजात शिशू रुग्णालयाला मुहूर्त ? सर्वस्तरीय कामाला गती
सकाळी ७.५० वाजता कल्याणहून ‘सीएसएमटी’कडे निघालेली धिमी एसी लोकल प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती. लोकल दिवा स्थानकात पोहोचताच एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल आठ ते सव्वा आठदरम्यान स्थानकातील फलाटावरच उभी होती. त्यामुळे दिवा ते कल्याणदरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पंधरा मिनिटांनंतर लोकल ‘सीएसएमटी’कडे रवाना झाली. हा बिघाड दुरुस्त होऊन वाहतूक पूर्ववत होत असताना ठाणे स्थानकात विनावातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही लोकल २० मिनिटे फलाटावर खोळंबली होती.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा