Headlines

Nagpur Ashadhi Ekadashi 2026 54 Railway Trains and 50 Special Bus Started for Warkari Pilgrims; मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आसुसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे अन् एसटीची आषाढीची वारी, गावातून थेट विठूरायाकडे


Ashadhi Ekadashi 2026 Special Train and Buses : पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्ये रेल्वेने आणि एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Ashadhi Ekadashi 2026 Special Train and Buses
वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे आणि बसेस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : वर्षभर संसाराच्या व्यापात अडकलेला प्रत्येक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी, स्वतःला विठ्ठलचरणी लीन करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात. भक्तांची हीच श्रद्धा आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने प्रवाशांची सोय केली आहे. मध्य रेल्वेने ५४ विशेष गाड्या आणि एसटी महामंडळाने ५० विशेष बसेस सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेसाठी बुधवार, १ जुलैपासून तिकिट बुकिंग सुरू झाले आहे.

५४ विशेष गाड्या चालविण्यात येणार

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे २२ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठी एकूण ५४ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही सेवांचा समावेश आहे. विदर्भातील भाविकांसाठी ही गाडी २३ व २४ जुलै रोजी नागपूरहून सुटणार आहे. परतीची सेवा २४ व २५ जुलै रोजी मिरजहून उपलब्ध राहील. ही गाडी पंढरपूरसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. यात वातानुकूलित, शयनयान, आणि सामान्य श्रेणीचे डबे राहतील.
Maharashtra TimesMaharashtra Weather Forecast: मुंबईसह राज्यातील ४ जिल्ह्यांसाठी ३ तास धोक्याचे, अतिमुसळधार पाऊस बरसणार; IMD चा ताजा अंदाज

प्रतिप्रवासी १,१७८ रुपये भाडे

रेल्वेसोबतच एसटी महामंडळानेही वारकऱ्यांच्या सेवेसाठी कंबर कसली आहे. महामंडळाच्या नागपूर विभागामार्फत पंढरपूर यात्रेसाठी ५० विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. नागपूर ते पंढरपूर या ६९९ किमीच्या प्रवासासाठी प्रतिप्रवासी १,१७८ रुपये भाडे ठरवण्यात आले आहे. या विशेष बसेस रविवार, १९ जुलैपासून सोडण्यात येणार असून ३० जूलैपर्यंत नियमित सोडण्यात येतील. या बसेस नागपूरहून वर्धा, यवतमाळ, पुसद, उस्मानाबाद, सोलापूरमार्गे पंढरपूरला जाणार आहेत. बसेसना तालुक्यांच्या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
Maharashtra TimesMaharashtra Rain Updates : मुंबई ठाण्यासह विरार-नवी मुंबईत पावसाचा तडाखा, लोकलची गती मंदावली, काही भाग जलमय, पावसाची सद्यस्थिती काय?

गावातून जा थेट विठूरायाकडे

पंढरपूरला जाण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेच्या १०० किलोमीटर परिसरामध्ये जर एकाच ठिकाणी ४० प्रवासी (भाविक) एकत्र येत असतील, तर एसटी महामंडळ त्यांना थेट त्यांच्या गावातून घेऊन पंढरपूरला रवाना करणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा एसटी महामंडळाच्या प्रवासी योजनेचा लाभ घेणारे कोणतेही प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विभागातून नियोजित ५० बसेसेपैकी निवडक बसेस या कळमेश्वर, सावनेर, काटोल, पारशिवनी, रामटेक आदी बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक गणेश तलमले यांनी दिली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा