Headlines

Mumbra Local Accident Rahul Gupta Death on 9 June 2025 Sisters missed Brother a year after; भाऊ रात्री कामावरुन येईल… मुंब्रा लोकल अपघातात राहुलला गमावून एक वर्ष लोटलं, बहिणींच्या नजरा आजही दाराकडे


Mumbra Local Accident Rahul Gupta Death : वर्षभरापूर्वी झालेल्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत भावाचा मृत्यू झाल्याने तो आता कधीच घरी येणार नाही, या दु:खद आठवणींनी बहिणींना गहिवरून आल्याशिवाय राहत नाही.

Mumbra Accident Rahul Gupta Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारा भाऊ रात्री कामावरून नक्की घरी येईल, अशी आस लागलेल्या बहिणींच्या रात्र होताच आजही घराच्या दरवाजाकडे नजरा खिळतात. मात्र, वर्षभरापूर्वी झालेल्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत भावाचा मृत्यू झाल्याने तो आता कधीच घरी येणार नाही, या दु:खद आठवणींनी बहिणींना गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. स्वत:ची हौस न करता बहिणींची सर्व हौस पुरवणारा भाऊ या जगात नसल्याने रक्षाबंधन, भाऊबीजेच्या दिवशी बहिणींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबलेले नाहीत. पोटचा मुलगा गमावल्याने आईसह संपूर्ण कुटुंब अद्याप या दु:खातून सावरले नाही.

गुप्ता कुटुंब दुःखाच्या छायेत

ऐन गर्दीच्या वेळी ९ जून, २०२५ रोजी सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळणावर दोन जलद लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, इतर काही प्रवासी जखमी झाले होते. मृतांमध्ये दिवा, साबेगाव येथील चाळीत आई-वडील, दोन बहिणी आणि एक भावासोबत राहणारा २८ वर्षांचा राहुल गुप्ता याचाही समावेश होता. या दुर्घटनेला आता वर्ष झाले असून राहुलच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गुप्ता कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Maharashtra TimesPlaza BEST Bus Accident : माझ्या भावाचा काय दोष? कुटुंब सावरणाऱ्या 25 वर्षीय नियाजचा बेस्ट बस अपघातात अंत, भावंडांचा बांध फुटला

भावाच्या आठवणीविना एकही दिवस नाही

मुंबईतील दुकानात काम करणाऱ्या राहुलचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत झाले होते. वयाच्या १३ ते १४ व्या वर्षापासून त्याने काम करण्यास सुरुवात केली होती, असे त्याची बहीण पूजाने सांगितले. भाऊ आमच्यात नाही, यावर आजही आम्हाला विश्वास बसत नाही. गेल्या वर्षभरात एकही असा दिवस गेला नाही की, भावाची आठवण आली नाही. तो रेल्वेतून पडल्यापासून आम्ही गेल्या वर्षभरात रेल्वेने फारसा प्रवास केला नसल्याचे ती म्हणाली.

Bachhu Kadu | आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

बहिणींचे डोळे आशेने दाराकडे

घटनेच्या दिवशी भाऊ डबा घेऊन घरातून कामावर निघून गेला. त्या दिवशी दुपारी १२ वाजता आम्हाला याविषयी समजले. माझा भाऊ ठीक आहे. तो रात्री कामावरून नक्की घरी परत येईल, या आशेने रात्र होताच आमच्या सर्वांचे डोळे दरवाजाच्या दिशेने वळतात, असेही पूजा हिने सांगितले. बहिणींचे विवाह थाटामाटात करण्यासाठी तसेच गावी घर बांधण्यासाठी भाऊ खूप कष्ट घेत होता.
Maharashtra TimesKerala Accident : पती-पत्नीचा अपघातात अंत, ऐनवेळी कार बदलल्याने चिमुरडी बचावली; शोकाकुल बॉस दुबईहून निघाला, कुटुंबाने अंत्यविधी थांबवून ठेवले
स्वत:ला कधी तो नवीन कपडे खरेदी करत नव्हता. मात्र, बहिणींची हौस पूर्ण करत असल्याची आठवण सांगताना पूजाचे डोळे अश्रूंनी पाणावले होते. तर, मुलाच्या आठवणींना उजळा देताना राहुलच्या आईच्या डोळ्यातून अश्रूंची धारच लागली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा