Headlines

Mumbai Vikhroli Father Son Double Murder Sister in Law threatens Neighbours Crime News; घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलं


मुंबई : विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगरमध्ये घरगुती कारणांवरुन भावांमध्ये सुरु असलेल्या जुन्या वादाचे रुपांतर गुरुवारी पहाटे एका भीषण घटनेत झाले. मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यावरुन झालेल्या भांडणाचे पर्यवसान प्राणघातक चाकू हल्ल्यात झाले. यात ४० वर्षीय पिता आणि १४ वर्षीय मुलगा यांचा मृत्यू झाला, तर आई, धाकटा मुलगा आणि एक शेजारी असे तिघे जण जखमी झाले आहेत. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी शेजाऱ्यांनी घराचा वीजपुरवठा खंडित करुन घरात अंधार केला. त्यानंतर आत प्रवेश करुन आरोपींना पकडले.

ही घटना विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा किशोरवयीन मुलगा श्लोक या दोघांनाही चाकू हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या होत्या. राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सुनील यांची पत्नी अंजू (३५) आणि धाकटा मुलगा विवान यांच्यावरही चाकूने अनेक वार झाले आहेत. त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महादेव मगर या शेजाऱ्याच्या उजव्या हातालाही चाकूची जखम झाली.

पोलिसांनी सुनीलचा भाऊ सूरज (३३) आणि सुरेंद्र (३६) तसेच सुरेंद्रची पत्नी प्रीती (३५) यांना हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Maharashtra TimesPune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं

तिघा भावांचा जुना वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही भाऊ राहुल नगरमधील एका लहान घरात (ज्यात पोटमाळा आहे) एकत्र राहत होते, तर त्यांचा सर्वात मोठा भाऊ अनिल नालासोपारा येथे राहतो.

मयत सुनील पूर्वी आरटीओ एजंट म्हणून काम करत होते, त्यांनी नंतर टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली होती, तर त्यांचे दोन भाऊ किरकोळ कामे करत होते. “वीज बिल भरण्यावरुन आणि इतर अनेक मुद्द्यांवरून या भावांमध्ये अनेकदा वाद होत असत” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या गुन्ह्यामागचे तात्कालिक कारण म्हणजे सुनीलच्या दोन मुलांपैकी एक जण मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात गाणी लावून होता, ज्याला सूरजने आक्षेप घेतला. वादाचे रुपांतर हिंसक मारामारीत झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कामावरुन नुकत्याच परतलेल्या सुनीलवर सुरेंद्र आणि सूरज यांनी हल्ला केला.

Maharashtra TimesPune Crime : मेडिटेशन सेंटरमधील महिलेवर एकतर्फी प्रेम, घटस्फोटित पुरुषाने जागा मालकाला संपवलं, पुण्यातील बाणेरमध्ये थरकापसुरेंद्रने सुनीलला पकडून ठेवले असताना, सूरजने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि सुनीलच्या मानेवर व छातीवर वारंवार वार केले. “सुनीलची पत्नी आणि मुलगा त्याला वाचवण्यासाठी धावले, पण त्या भावांनी त्यांच्यावरही हल्ला करण्यास सुरुवात केली” असे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले.

वडिलांना वाचवताना श्लोक मध्ये पडला

१४ वर्षीय श्लोकने आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सूरजने त्याच्याही मानेवर चाकूने दोनदा वार केले. पती आणि श्लोक यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना अंजूवरही दोनदा वार करण्यात आले, तर विवानलाही दुखापत झाली.

जावेने दरवाजा लावला

गोंधळ ऐकून परिसरातील रहिवासी त्या घराकडे धावले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सुरेंद्रची पत्नी प्रीतीने बाहेरून दरवाजा लावून घेतला होता आणि ती पहारा देत उभी होती, त्यामुळे शेजाऱ्यांना हस्तक्षेप करता आला नाही.

महादेव मगर या शेजाऱ्याने अखेरीस बळजबरीने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यास प्रीतीने त्याला अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. “झटापटीदरम्यान माझ्या उजव्या हातावर दोनदा चाकूने वार झाले आणि तो वार आरपार गेला,” असे मगर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

Maharashtra TimesCrime News : ग्लुकोज ड्रिपमधून पतीला विष, प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओने महिला गोत्यात, मृत्यूच्या तीन महिन्यांनी बॉडी बाहेर काढण्याची वेळजखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी सुनील आणि श्लोक यांना मृत घोषित केले. अंजू, विवान आणि महादेव मगर यांच्यावर उपचार करण्यात आले; नंतर अंजू आणि विवान यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आणि फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले