Headlines

Mumbai Pune Railway Route Heavy Rains Cause Landslides Six Express Trains Cancelled; दरडीचा दुहेरी फटका; Mumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका; मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सहा अतिगर्दीच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांचा पर्यायी व्यवस्थेचा शोध, जाणून घ्या अपडेट्स


Mumbai Pune Six Railway Cancelled : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग दरड कोसळून ठप्प झाला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इंद्रायणी, डेक्कन क्वीनसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

Mumbai Pune Six Railway Cancelled
मुंबई पुणे सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या कॅन्सल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, मुंबई-पुणे घाट विभागात दरड कोसळल्यानं मध्य रेल्वेनं आज सोमवारी रोजी मुंबई-पुणे मार्गावरील सहा महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास ऐनवेळी विस्कळीत झाला असून, अनेकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.

मलबा साचल्यानं रेल्वे वाहतूक धोकादायक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरवाडी-मंकी हिल या घाट विभागात किलोमीटर ११६/९०० ते ११६/४०० दरम्यान तसेच अप मेन लाईनवरील किलोमीटर ११४/९०० येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे रुळांवर माती, दगड व मलबा साचल्यानं रेल्वे वाहतूक धोकादायक बनली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे प्रशासनानं संबंधित मार्गावरील काही गाड्या तातडीने रद्द केल्या.
Maharashtra TimesPatan Village Landslide : मावळमध्ये घरावर दरड कोसळली, तिघांच्या मृत्यूची भीती; लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पाऊस, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

कोणकोणत्या गाड्या रद्द?

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये २२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, १२१२७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, ११००७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, १२१२३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे डेक्कन क्वीन, १२१२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे प्रगती एक्स्प्रेस, ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरड हटविण्यासाठी आणि रेल्वे मार्ग सुरक्षित करण्यासाठी अभियांत्रिकी विभाग, ट्रॅक मेंटेनन्स पथके आणि अन्य कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. रुळांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. गाड्या रद्द झाल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे तसेच उत्तर महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले असून, काहींनी एसटी व खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे.
Maharashtra TimesMaharashtra Rain Update : पावसाचा कहर; मुंबईसह उपनगरात मुसळधार, तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने, रस्ते वाहतूक ठप्प, चाकरमान्यांचे हाल; रेड अलर्ट जारी

प्रशासनाकडून महत्त्वाचं आवाहन

दरम्यान, घाट विभागात पावसाचा जोर कायम असल्यानं रेल्वे प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, हेल्पलाइन किंवा NTES ॲपद्वारे आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे. तसेच हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल अथवा अतिरिक्त रद्द करण्याचे निर्णयही घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा