Headlines

Mumbai police shocking act with protester girl demands for strict action; मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य; संताप आणणारा व्हिडिओ समोर, कठोर कारवाईची मागणी


Student Protest: नवी दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही प्रतिसाद मिळत असताना, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

mumbai police
मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. मात्र व्यवस्थेविरोधात आपला असंतोष मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या तरुणांसोबत काही पोलीस कर्मचारी संतापजनक कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. दादर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान तरुणीला एका व्यक्तीने चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणीचा विनयभंग करणारा व्यक्ती पोलीस दलात कार्यरत असल्याचं सांगितलं जात असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांचा आक्रोश रस्त्यावर दिसू नये, यासाठी सरकारने मुंबईत काही दिवसांसाठी जमावबंदी लादण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारच्या या निर्णयानंतरही तरुण उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा दाखला देत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. अशातच नुकतंच मुंबईतील एका आंदोलनादरम्यान तरुणांची धरपकड सुरू असताना सिव्हिल ड्रेसवरील कर्मचाऱ्याने तरुणीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचं समोर आलं. या प्रकारानंतर विविध राजकीय नेत्यांनी चीड व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, “हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या व्हिडिओवरून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. “हा पोलीस कर्मचारी काय करतोय? त्याने महिला पोलिसाला का पुढे केलं नाही? हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही,” असं त्या म्हणाल्या.
‘अमली पदार्थ खिशात टाकून अडकवेन!’

मोटार परिवहन विभागातील पोलिस चालक आंदोलक तरुणांना समज देताना ‘पुन्हा दिसल्यास खिशात ड्रग्ज टाकून अडकवेन’ अशी धमकी देत असल्याचा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. धमकी देणारा पोलिस चालक पवन सांगळे याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, याची गंभीर दखल घेत त्याला पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा